Saturday, September 16, 2017

शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ३१ )

परिस्थिती पाहून निर्णय घेणे व तो अंमलात आणणे हा सुजाण माणसाचा गुणधर्म असतो. परिस्थिती विपरीत असेल तर आयुष्यभर उरी बाळगलेल्या कल्पना बाजूला ठेवून नवा निर्णय करावा लागतो. केवळ आंधळ्या अट्टाहासापायी अनमोल जीवन गमावणे हे खचितच शहाणपणाचे लक्षण नसते. शाहूचरित्र वाचताना याप्रकारची एक गोष्ट मनं वेधून घेते. शाहूराजाप्रती असणारा आदरभाव यातून प्रकटतोच तथापि स्वतः शाहूराजा किती वास्तववादी जगत होता ते ही कळते. चला..पाहूया

*पहिल्या महायुध्दात बहुसंख्य मराठी सेना तुर्कस्थानात लढत होत्या.कुट - एल - आमारा येथे तुर्की फौजांनी मराठा फौजेस वेढा दिला. जसा वेढा लांबत चालला तशी मराठा फौजेची बाहेरील रसद बंद झाली. मराठा फौजेस अन्नधान्य पुरवठा कमी पडू लागला . उपासमार सुरु झाली . आता घोड्याचे मांस खाऊन जगले पाहिजे असे तेथील अधिकारी म्हणू लागले.धर्मशास्त्राप्रमाणे घोड्याचे मांस खाणे निषिद्ध आहे असे मराठा सैनिक म्हणू लागले. अधिकारी लोकांना यावर तोडगा सापडेना. पलटणीतील लोकांचे असे म्हणणे होते की " आम्हास शाहू महाराजांनी घोड्याचे मांस खाण्याची परवानगी दिली तर आपण घोड्याचे मांस खाऊ " मुंबई सरकारने शाहूराजाना ही गोष्ट कळवली. महाराजांनी परिस्थिती ध्यानात घेऊन लगेचच आज्ञापत्र लिहिले की " शत्रुचा वेढा पडलेल्या मुदतीत घोड्याचे मांसाचा खाण्यासाठी उपयोग करावा." पुढे असेही म्हणतात की , जातीनिर्बध मोडले बद्दल तुम्हांला अजिबात दूषण लागणार नाही . माझ्या शब्दावर भरवसा ठेवून वागावे.  या आज्ञापत्राचा अपेक्षित परिणाम झाला. घोड्याचे मांस खाऊन मराठा सैनिक जगले......काय कळते या गोष्टीतून ?? संपूर्ण देशभरात फक्त शाहूराजाचेच नाव त्या मराठा सैनिकांना घ्यावेसे वाटले हे शाहूराजाचे मोठेपण आहेच. शाहूराजाही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून निर्णय घेतला म्हणून तर मराठा सैनिक वाचले. धर्मशास्त्राचा दाखला देत बसले असते तर सैनिकाचे प्राणास मुकावे लागले असते. परिस्थिती पाहून धर्मशास्त्राचा कालसुसंगत अर्थ लावायाचा असतो हे शाहूराजाने दाखवून दिले. शाहूराजाचा शब्द म्हणजे अंतिम शब्द एवढा विश्वास मराठा सैनिक बाळगत होते हे सुध्दा यातून दिसून येते.*

आजकाल जर अशी,परिस्थिती चुकून निर्माण झाली तर कुणाचा शब्द मानला जाईल अशी,परिस्थिती खासच नाही. कारण शाहूराजाचा शब्द आणि आजकालचे राज्यकर्ते वर्गाचा शब्द यामध्ये जमीन अस्मानचे अंतर आहे. धर्मशास्त्र बाजूला ठेवून कालसुसंगत निर्णय करणारा नेता सध्या दिवा घेऊन शोधावा लागेल. म्हणून तर शाहूराजाचे वेगळेपणा कायमचा मनात ठसतो. परिस्थिती पाहून कालसुसंगत निर्णय करा , प्रसंगी धर्मशास्त्राचे नियम बाजूला ठेवा...हेच तर शाहूचरित्र शिकवते.

*!! शब्दाला किंमत असायला हवी तर....चारित्र्य बिनतोड असायला हवे !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...