Tuesday, September 26, 2017

शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ३६ )

राजा म्हटल की डोळ्यासमोर उभी राहती ती प्रतिमा म्हणजे महालात राहणारा , गाद्यागिरद्यांवर लोळणारा , उंची मद्ये रिचवून छानछोकीचे आयुष्य जगणारा अशी असते. या राजेशाही थाटाला अपवाद म्हणून काही हाताच्या बोटावर मोजावेत इतक्याच जनकल्याणी राजांनी छेद दिला. असे राजे लोकराजे ठरले आणि वर्षानुवर्षे त्याची आठवण काळजात रयत बाळगत असते. अशा अपवादात्मक राजांच्या रांगेत खचितच शाहूराजा विराजमान आहे. कसे ते पाहूया..

*तोफखाने ....या शाहूराजाचे अत्यंत जवळच्या व्यक्तीने शाहूराजाचे रितसर वर्णन अगदी काटेकोरपणे नोंदवून ठेवले आहे. दररोज साधारणपणे आठदहा तास तोफखाने महाराजासोबत असत. त्यांनी मुद्दामहून महाराजाची राहणीचे निरीक्षण केले. अन् ते आश्चर्याने उडालेच. महाराज रोजचे जे फर्निचर वापरत असत ते म्हणजे चित्यासाठी वापरली जाणारी ३ - ४ बाजली असत. महाराजांच्या भेटीला येणाऱ्या लोकाकरता एखादा कोच व चारसहा खुर्च्या असत.एका बाजल्यावर महाराज स्वतः बसत. अशा बाजल्यावर गाद्या , लोड , तक्के असे काही नसायचे. तर सांबराची सातआठ कातडी एकावर एक घालून शिवलेली असायची. कापूस नावालाही नसायचा. झोपायलाही तशाच कातड्यांची एकत्र शिवलेली गादीवजा बैठक नित्य वापरत. पावसाळ्याशिवाय महाराज झोपत तेव्हा त्या जागेवर छत फक्त आकाशाचेच असे. गादीवर झोपणे महाराजांना आवडत नसे. आणखी आश्चर्य म्हणजे महाराज जे सदरे वापरीत ते मलमलीचे असून त्या मलमली बहुधा बाभळीच्या सालीने रंगवलेल्या असत.....काय आढळून येते यातून ? महाराज हे अत्यंत साधी राहणी बाळगत. आपण राजे आहोत असा अहंकारी दृष्टिकोन चुकूनही त्यांना शिवला नाही. सर्वसामान्य माणसे जशी जगतात तसेच त्याचे वर्तन नेहमीच राहिले. जेवणाच्या ताटापासून ते वापरावयाचे फर्निचर ते अगदी झोपावयासाठी लागणारे साहित्य हे कधीच उंची थाटाचे नव्हते. आपण छत्रपती आहोत याचा अर्थ आपण जनतेच्या प्रेमाचे विश्वस्त आहोत असा मानवतावादी विचार सतत त्यांनी बाळगला म्हणून तर ते लोकराजे झाले.*

आजकालचे आमचे राज्यकर्ते वर्गाचा " रुबाब " पाहिला की ही नवीन सरंजामी औलादी लगेच मनातून उतरतात. एखादा लहान नेता जरी यायचा म्हटला तर त्याच्या तयारीसाठी होणारी धावपळ पाहिली कि हे नेते म्हणजे नवसरंजामदारच आहेत असे वाटू लागते. हे नेते आयुष्यात कितीही भ्रष्टाचार करून पैसाअडका मिळवोत...पण जनतेच्या प्रेमाचा लाभ यांना कधीच मिळत नाही. ही " श्रीमंती " त्यांनाच मिळते जे स्वकल्याणार्थ नव्हे तर जनकल्याणार्थ जगतात ....शाहूचरित्र हेच तर शिकवते.

*!! थाट अहंकारी ...त्याची जनतेच्या प्रेमाची झोळी रिकामी !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५
==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...