*आई...आज घटस्थापना होणार.*.
*पोटात मूली मारणारे "सुशिक्षित लोक"* जगदंबेची स्थापना करणार..
आई तुझ्या नावाने आज घटस्थापना होणार..||1||
*काहि लाखासाठी "सुनेला जिवंत जाळणारे"* आपल्या खोट्या प्रतिष्ठेसाठी "सुनेला" छळणारे.
आज स्त्री-शक्तिरूपम् देवीला पूजनार......
आई आज तुझ्या नावाने घटस्थापना होणार..||2||
भर चौकात "सोडलेल्या वळुसारखे"
उभे राहून *जाणाऱ्या येणाऱ्या बाळ-बेटिंची छेड़ काढणारे* ९ दिवस चप्पल न घालता आई जगदंबे तुझा उपवास करणार.....
आई आज तुझ्या नावाने घटस्थापना होणार..||3||
नवरा म्हणुन *बायकोला रोज "गुलामासारखे" वागवणारे* रोज सकाळी बायकोसोबत शीलवान बनून मंदिरात जाणार....
आई आज तुझ्या नावाने घटस्थापना होणार..||4|
सांग आई असे किती दिवस चालणार..
खरच अश्या लोकांना तू पावनार की कोपनार...
मातृत्वाची हेळसांड, स्त्रित्वाचा अपमान करणाऱ्या "पाखंडी भक्तांमुळे"
हे खड्गधारी काली...हे करवीर-निवासिनी अंबे..हे जगदंबे..
तुझ्या स्थापनेचे घट कसे ग पवित्र होणार..||
*सन्मान करा स्त्रीचा आणि तिच्या स्त्रीत्वाचा*
No comments:
Post a Comment