Tuesday, October 4, 2016

एक गंमत सांगू तुला ......?

☝एक गंमत सांगू तुला ...?

लहानपणी चणे फ़ुटाणे खूप आवडायचे खायला..

पण दहा पैसेही परवडायचे नाहीत खिशाला..

म्हातारपणी रुपयांनी खिसा भरला
पण मोडके दात बघून चणे लागले चिडवायला...

एक गंमत सांगू तुला ...?

लहानपणी वाटायचं,
नविन पुस्तके हवीत वाचायला..

पण चोरुन, लपुन,उसनी मित्रांची पुस्तके  घेवून अभ्यास पूर्ण केला..
म्हातारपणी नवीन पुस्तकांचा ढीग येवून पडला
पण तो पर्यंत चष्म्याचा नंबर सोडावाँटर झाला...

एक गंमत सांगू तुला ....?

लहानपणी रिक्षातून आवडायचे फ़िरायला
पण सव्वा रुपायासुध्दा नसायचा कनवटीला..
म्हातारपणी ड्रायव्हर म्हणतो गाडी तयार आहे, चला फ़िरायला
पण जीना उतरेस्तवर
पाय लागतात लटपटायला...

एक गंमत सांगू तुला .....?

लहानपणी 10✘10 ची खोली होती रहायला,
दमून भागून आलो की क्षणात लागायचो घोरायला..
म्हातारपणी चार खोल्यांचा मोठा ब्लाँक घेतला,
पण एकेक खोली आ वासून येते खायला...

एक गंमत सांगू तुला ......?

खूप शिकून मुलगा अमेरिकेला गेला,
फ़ार फ़ार आनंद झाला पण भिती वाटते मनाला..
मृत्युसमयी येईल का तो पाणी द्यायला,
का
ई-मेलवरच शोकसंदेश पाठवेल आपल्या आईला.

म्हणून म्हणतो मित्रांनो......आताच जगणं शिका.
आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगा...
ज्या क्षणी तुम्ही मरण पावता,

त्या क्षणी तुमची ओळख एक
बॉडी ' बनुन जाते
,'बॉडीला' आणा , बॉडीला झोपवा ,

लोक तुमच्या नावाने सुद्धा हाक मारत नाही.

म्हणूनआव्हाने स्वीकारा,

आवडत्या गोष्टीसाठी ख़र्च करा

आवडत्या लोकांना वेळ दया,

पोट दुखेपर्यन्त हसा, कोणीबालीश

म्हणाले तरी चालेल. 

मनसोक्त नाचा,लग्नात, वरातीत.जिथे भेटेल तिथे नाचा.

अगदी लहान बाळासारख़ जगा.
कारण,

'मृत्यु' हा जीवनतला सर्वात मोठा लॉस नाहिये , लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला "जिवंतपणा"मेलेला असतो.         

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...