माणूस काही अहंकार
सोडायला तयार नाही
जगण्याचं " सूत्र " चुकतंय
पण खोडायला तयार नाही
भाऊ काय बहीण काय
नुसता फापट पसारा
कोण कोणाला विचारतय
कुणालाही विचारा
कुणी कोणाकडे जाई नं
कुणी कुणाकडे येई नं
जगलात काय मेलात काय
माया कुणाला येई नं
संवेदनशीलता आता
फारशी कुठं दिसत नाही
बैठकीत किंवा वसरीवर
गप्पाची मैफिल बसत नाही
पॅकेज, इनक्रिमेंट, सॅलरी
इन्व्हेस्टमेंट, विकएन्ड
यातच हल्ली माणसाचा
होत आहे the end
Luxury मधे लोळतांना
फाटकं गाव नको वाटतं
जवळचं नातं असलं तरी
सांगायलाही नको वाटतं
उच्च शिक्षित असूनही
माणूस आज mad वाटतं
इंटेरियर केलेल्या घरामधे
लुगडं, धोतर odd वाटतं
सगळेच पाहुणे सगळेच मेव्हणे
कसे काय posh असतील
पार्लर मधून आणल्या सारखे
चिकणे चोपडे कसे दिसतील
उन्हा तान्हात तळणारी
माणसं काळी पडणारच
गरीबीन गांजल्यावर
चेहऱ्याचा रंग उडणारच
कुरूप ते नाहीत
कुरूप तू झालास
प्रेम नात्यावर करायचं सोडून
दिसण्याला भुलून गेलास
काळी असो गोरी असो
माय ही माय असते
बाप स्वतःला गाडून घेतो
म्हणून तुझी मजा असते
पात्र कितीही मोठं झालं
तरी गंगेच मूळ विसरू नये
सुख असो का दुःख असो
आपल्या माणसाला विसरू नये
दिसण्यावर प्रेम करू नकोस
आपलं समजून जवळ घे
एरव्ही नाही आलास तरी
दिवाळीला तरी घरी ये
कॉम्पुटरच्या भाषा खूप शिकलास
माणसावर प्रेम करायचं शिक
नाहीतर मानसिक आरोग्यासाठी
दारोदार मागत फिरशील भीक
दुसऱ्याचा छळ करून
तुम्ही सुखी होणार नाही
पॅकेज कितीही मोठं असू द्या
जगण्यात मजा येणार नाही
जग जवळ करतांना
आपली माणसं तोडू नका
अमृताच्या घड्याला
अविचाराने लाथाडू नका..!
*मी का बोलू?*
*मी का फोन करू?*
*मी का कमीपणा घेऊ?*
*मी का नमते घेऊ?*
*मी का नेहमी समजून घ्यायचं?*
*मी काय कमी आहे का?"*
असे बरेच सारे "मी" आहेत जे आयुष्यात विष कालवतात
म्हणून , मी पणा सोडा व नाती जोडा !! ...
============================================================================= जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा E-mail करा.
आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !
No comments:
Post a Comment