Tuesday, October 25, 2016

सुंदर कविता : भाग १


या कविता मी केलेल्या नाहीत.माझ्या वाचनाच्या प्रचंड आवडीमुळे माझ्या नजरेत आल्या, मला आवडल्या, त्यातील काही निवडक कविता पोस्ट करत आहे .आवडल्या तर नक्की सांगा.

सुंदर कविता

*आधी काळजात रेंज पाहीजे ...*

तेच तेच जगणं
तेच तेच जीवन
रोज रोज तेच
सारख सारख जेवण.
आयुष्यात कधी कधी थोडातरी
चेंज पाहिजे,
*ऐकमेकांशी बोलता येते पण आधी*
*काळजात रेंज पाहीजे.....*

भाऊ भाऊ दुर झाले
आईबापाच ओझं झालं,
अर्ध अंगण तुझ अन्
अर्ध अंगण माझ झालं.
थोडतरी काळजात आपुलकीचं
कव्हरेज पाहीजे,
ऐकमेकांशी बोलता येते पण आधी
काळजात रेंज पाहीजे....

हल्ली घरातल्या घरात
अंगत पंगत बसत नाही
आपुलकी प्रेम जिव्हाळा
दुरदुर दिसत नाही.
घराघरात प्रत्येकाला
आयुष्य अँरेंज पाहीजे,
ऐकमेकांशी बोलता येते पण आधी
काळजात रेंज पाहीजे....

ऐकमेकांचे सुखदुःख
ऐकमेकांनीच वाटायचं
आपुलकीनं मायेनं
ऐकमेकांना भेटायचं.
एकत्र पंगतीत जेवतांनाही
शेतातलं ताजे व्हेज पाहिजे,
*ऐकमेकांशी बोलता येते पण आधी*
काळजात रेंज पाहिजे !!

===================================

"मी सुद्धा चुकलो असेन",
एवढं मनात आणा!
धनुष्य मग हातातलं,
जरा संयमानंच ताणा!

बाणच हळू कानात सांगेल,
'ठेव मला भात्यात!
एवढं ऊन, एवढा पाऊस,
असणारच की नात्यात!'

वादा जवळ गप्प बसून,
संवाद करू, मारू गप्पा!
तुटण्या किंवा उसवण्याचा,
येणारच नाही टप्पा!

'अन्याय झाला' वाटेल तेव्हा,
पहिलं प्रेम आठवा!
आठवणीतलं ऐश्वर्य मग,
आतल्या खणात साठवा!

तेवढाच क्षण टळल्यावर
आकाश होतं साफ!
दंव होऊन गारवा देते,
तीच गरम गरम वाफ!

एक क्षण आवेगाचा, 
फुटण्यापुर्वी अडवा!
डोळे सुद्धा राग बोलतात,
पापण्यांमागे दडवा!

थोडी गुदमर, थोडी घुसमट,
उंबरठ्यावर दाटेल!
राख झाली तरी चालेल,
असं वाटेल, ...पटेल!

दिवस रात्र असणारच,
तेव्हा आपण पूर्व बघू!
प्रकाशाचे वारकरीच की!
आपण उगवतीला निघू!

पहिली ठिणगी पडते तेव्हा,
विचार व्हावा पाणी!
मनात सूर जपतो तेव्हाच,
शब्द होतात गाणी!

कधीकधी आठवण्याहून,
विसरण्यातच मजा!
बेरजेपेक्षा कधीकधी ,
जोडून देते वजा!

बाकी उरणं महत्वाचं,
तेवढीच श्री शिल्लक!
कविता असेल साधी,
पण् विचार मात्र तल्लख!

संदीप खरे

==================================

मस्जिद पे गिरता है
मंदिर पे भी बरसता है..
ए बादल तेरा मजहब कौनसा है...

इमाम की तू प्यास बुझाए
पुजारी की भी तृष्णा मिटाए..
ए पानी तेरा मजहब कौनसा है....

मज़ारो की शान बढाता है
मुर्तीयों को भी सजाता है..
ए फूल तेरा मजहब कौनसा है.....

सारे जहाँ को रोशन करता है
सृष्टी को उजाला देता है..
ए सुरज तेरा मजहब कौनसा है...

मुस्लिम तूझ पे कब्र बनाता है,
हिंदू आखिर तूझ में ही विलीन होता है
ए मिट्टी तेरा मजहब कौनसा है....

खुदा तो तू है पर
ईश्वर भी तू है
फिर आज बता ही दे
ए परवरदिगार.......
तेरा मजहब कौनसा है.........

=================================

विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही.....
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही...ll

छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही ..

माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..

रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर..
डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही..

येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही ....

-सुरेश भट

================================

उलझनों और कश्मकश में..
उम्मीद की ढाल लिए बैठा हूँ..

ए जिंदगी! तेरी हर चाल के लिए..
मैं दो चाल लिए बैठा हूँ |

लुत्फ़ उठा रहा हूँ मैं भी आँख - मिचोली का ...
मिलेगी कामयाबी, हौसला कमाल का लिए बैठा हूँ l

चल मान लिया.. दो-चार दिन नहीं मेरे मुताबिक..
गिरेबान में अपने, ये सुनहरा साल लिए बैठा हूँ l

ये गहराइयां, ये लहरें, ये तूफां, तुम्हे मुबारक ...
मुझे क्या फ़िक्र.., मैं कश्तीया और दोस्त... बेमिसाल लिए बैठा हूँ...
===================================
    
'राम' म्हण, 'अल्ला' म्हण
'येशू' म्हण, 'साई' म्हण
'देव' म्हण, 'दूत' म्हण
'अवतार' म्हण, 'काही' म्हण

मी हरकत घेण्याचंही
कारण नाही काही..
पण माणूस म्हणून एक गोष्ट
खरंच पटत नाही !

तू हवी त्याची पूजा कर
हवी त्याची आरती गा
मॅगी, पिझ्झा, चिकन, मटन
प्रसाद म्हणून काही खा !

चोविस तास देव देव कर
वाटल्यास विसर घर
पण माझ्यासाठी दोस्ता फक्त
एवढा विचार कर !

देव म्हणजे सुपर पाॅवर
ब्रम्हांडावर ताबा
मग त्याचं आॅफिस गल्लीबोळात
कशाला रे बाबा ?

ऐकलं होतं.. देव असतो
उभा सत्त्यापाठी !
तरी त्याच्या अवती भवती
दलालांची दाटी ?

चोर, डाकू, बलात्कारी
सारेच त्याचे भक्त
देव काय नुसते चेहरे
बघत बसतो फक्त ?

असा कसा चिडत नाही
त्याला नाही भान ?
वरून तुझ्यासारखे मूर्ख
तिथंच देतात दान !

देवळा भवती भिकारी
लुळे पांगळे जीव
ज्याला असेल काळीज त्याला
पाहून येते कीव !

प्रश्न त्यांचे सुटत नाहीत
दुःख सरत नाही
तरी तुझा सुपर देव
काहीच करत नाही !

म्हणून म्हणतो डोकं वापर
गहाण नको ठेऊ
भुकेल्याला, तहानल्याला
घाल कधी जेवू !

अनाथ, कोवळ्या हातामधे
पाटी-पुस्तक ठेव
आई शप्पथ तुला सांगतो
तूच होशील देव ! =============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा.
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...