अँग रिटा शेर्पा
जन्म : १९४७ साली थामे कुटूंबामध्ये,
एव्हरेस्ट परिसरातल्या सोलोकुंभ जिल्यात नामचे गावाजवळील थामे वस्तीत तो लहानाचा मोठा झाला . छोटीसी शेती व याक चारणं हा त्याचा व्यवसाय.
वयाच्या १३ व्या वर्षांपासून तो हमाली करायला लागला.गिर्यारोहकाच सामान पाठीवरून वाहून नेऊ लागला.१९७० सालापासून गिर्यारोहकाबरोबर छोटी छोटी शिखर सर करू लागला .
१९८० साली स्पॅनिश टिम बरोबर अँग रिटा कृत्रिम प्राणवायूशिवाय ८१६७ मीटर उंचीच्या धौलगिरी शिखरावर पहिल्यांदा गेला.परत याच ठिकाणी तो १९८२ साली स्विझर्लंड टीम बरोबर गेला.
यानंतर तो एव्हरेस्टवर ज्याण्याची संधी मिळते का याची चातकासारखी वाट पाहू लागला.आणि अखेर त्याला ती संधी १९८३ साली अमेरिका आणि जर्मनीच्या संयुक्त एव्हरेस्ट मोहिमेत हमाल म्हणून सहभागी झाला.गिर्यारोहनातील सगळं कसब पणाला लावून नैऋत्य दिशेकडून ७ मे १९८३ ला कृत्रिम प्राणवायू न वापरता तो एव्हरेस्टवर पोहचला.१९८३अगोदर अशी कामगिरी कोणीही केली नव्हती.हा त्याचा विश्वविक्रम होता.त्याला स्वर्ग जिंकल्याचा आनंद मिळाला.ही त्याची पहिली वेळ होती.
ऑक्टोबर १९८४ साली झेकोस्लोव्हाकियाच्या टीम बरोबर पुन्हा एकदा कृत्रिम प्राणवायू न वापरता तो दुसऱ्यांदा एव्हरेस्टवर पोहचला.त्याच वर्षी तो परत एकदा बेल्जमच्या पथकबरोबर तिसऱ्यांदा धौलगिरी शिखरावर गेला.
मग मात्र तो न थकता दरवर्षी एव्हरेस्ट मोहिमेवर जात राहीला.एप्रिल १९८५साली नार्वेजियन टीम बरोबर तिसऱ्या वेळी एव्हरेस्ट सर केलं.१९८६ ला स्पेनच्या गिर्यारोहकासोबत तो८५९४ मी.उंच कंचनगंगा शिखर गाठले. त्याचवर्षी तो ८२०१मी.उंच चोओयू शिखरावर अमेरिकन चमुबरोबर गेला.
एव्हरस्ट त्याला साद घालत होता.मग तो २२ डिसेंबर १९८७ ला कोरियन पथकसोबत ४थ्या वेळी एव्हरेस्ट गाठलं. प्रथमच पश्चिमेकडील अवघड मार्गाने तो एव्हरेस्ट वर पोहचला.दरम्यान तो जर्मन संघाबरोबर तांत्रिकदृष्ट्या चढाईस अवघड अश्या ७८००मी उंच मकालु शिखरावर गेला. लगेच दहा महिन्यातच तो पाचव्या वेळी १४ आक्टोबर १९८८ ला स्पॅनिश पथकसोबत एव्हरेस्टवर तो नैऋत्य दिशेकडून गेला.
दरवर्षी एवरेस्ट सर करणाऱ्या अँग रिटा बद्दल लोकांना कौतुक वाटू लागलं.कुतूहल वाटलं.त्याचबरोबर ते त्याचा आदर करू लागले.१९९०साली अँग रिटाने स्वतः एव्हरेस्ट मोहीम आखली.नेपाळ सैनिकसोबत असलेल्या या मोहिमेत तो एव्हरेस्टवर सहाव्यांदा २४एप्रिल१९९९ला पोहचला.
दोन वर्षानंतर १९९२ ला सातव्या वेळी तो चिली देश्याचा पथकबरोबर कृत्रिम प्राणवायू शिवाय पोहचला. खरतर हा त्याचा विश्वविक्रम होता.पण नेपाळी हमाल म्हणून एव्हरेस्टवर जाण त्याच कामच आहे अस जगाला वाटलं असावं.कारण त्याच कोणी अभिनंदन केलं नाही.प्रसिद्धी तर त्याच्यापासून कोसो दूर राहिली.पण याची त्याला मूळी पर्वा नव्हतीच.
मे १९९३ मध्ये स्पॅनिश टीम सोबत आठव्यांदा तो एवरेस्टला भेटला.१९९५ला रशियन गरियरॉकबरोबर त्यां तिसऱ्या वेळी चोओयू शिखर सर केलं.
मे १९९५ रशियन टीम बरोबर त्याच्या वयाच्या ४७व्या वर्षी तो नवव्यांदा यशस्वीरित्या एव्हरेस्टवर पोहचला.यानंतर रशियन टीमनं एक प्रत्रकार परिषद घेतली,त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली.पण यात अँग रीतच नाव घेतलं गेलं नाही,एका नेपाळी प्रत्रकरानं अँग रिटा बद्दल त्यांना विचारलं त्यावेळी रशियन टीमनं अँग रिटाचा विश्वविक्रम जगाला सांगितला.
नेपाळ सरकारनं यावेळी आपल्या भूमीपुत्राच भरभरून कौतुक केलं.पाच लाख रुपये परितोषिक म्हणून दिले.जाहीर सत्कार केला.यावेळी पहिल्यांदा जगाला कळलं की अँग रिटा नऊ वेळा कृत्रिम प्राणवायू न वापरता एव्हरेस्टवर गेला आहे.
२३ मे १९९६ ला अँग रिटा स्वीडन,अमेरिका व न्यूझीलंडच्या हौशी गिर्यारोहकाबरोबर दहाव्या वेळी एव्हरेस्टवर पोहचला. या मोहिमेत एव्हरेस्टच्या खाली काही अंतरावर आठ गरियरोहक वादळंमुळे बळी गेले. जगभरातले प्रत्रकार काठमांडूत पोहचले,आठ गिर्यारोहकाच्या मृत्यूची दुःखद घटना जगभर पोहचली.पण कोणीही अँग रीटाचा उल्लेखही लेला नाही.टाईम या मासिकात या दुःखद घटनेचा सविस्तर वृत्तांत छापून आला,त्यात शेवटी एक अज्ञात शेर्पा २३ मेला एव्हरेस्टवर पोहचला एवढाच त्रोटक उल्लेख त्यात होता.
२९०००फुटांपेक्षा जास्त उंच एव्हरेस्टवर प्राणवायू अतिशय विरळ आहे.तरी तू कृत्रिम प्राणवायू न वापरता दहा वेळा एव्हरेस्टवर का गेलास?अस विचारताच अँग रिटा म्हणतो,
"माझी फुफ्फुस चांगलीच बलवान आहेत.विरळ प्राणवायू असलेल्या परिस्थितीत मला श्वसनाचा त्रास होत नाही.म्हणून मी कृत्रिम प्राणवायू वापरला नाही."
आतापर्यंत हजारो गरियरोहकानी एव्हरेस्ट मोहिमेत भाग घेतला आहे.त्यापैकी फार थोडे एव्हरेस्टवर पोहचले,अनेकांना प्राण गमवावे लागले.तू मात्र दहा वेळा सुरीक्षितपणे एव्हरेस्टवर गेलास त्याचे रहस्य काय?या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणतो,
"अनेक लोक पर्वतशिखराबद्दल आदरभाव व श्रद्धा राखत नाहीत.दगडधोंड्याचे व बर्फाचे बनलेले शिखर हे केवळ निर्जीव नसून ते एक विराट जीवन आहे असे मानत नाहीत.आपण पर्वतशिखरापेक्षा उंच आहोत हा अहंकार मनात ठेवतात.म्हणून दरवर्षी अनेक लोक एव्हरेस्टवर चढाई करताना मरतात.तुम्ही पर्वतशिखरांचा मन राखा,त्यांचा मन राखा,श्रद्धेने त्याच्यापुडे मस्तक झुकवा, नमवा. ते तुम्हाला निराश करणार नाही.सार काही देईल.यश,कीर्ती ,समृद्धी देईल.या भावनेनं मी एव्हरेस्टवर चढतो.म्हणून दहा वेळा मला त्यानं आपल्या जवळ येऊ दिलं आहे."
No comments:
Post a Comment