Wednesday, October 26, 2016

जाहीर आवाहन

.       ��*साथी हात बढाना!*��

*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही एक विवेकवादी जनचळवळ आहे.* चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतरही ही चळवळ खंबीरपणे लढत आहे.

आम्ही खालील चतु:सुत्रीच्या आधारे काम करतो.
*१) शोषण करणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे.*

*२) वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगिकार करणे.*

*३) धर्माची विधायक चिकित्सा करणे.*

*४) व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेणे.*

*राज्यात हजारो कार्यकर्ते स्वतःचा वेळ, श्रम आणि पैसा खर्च करून हे काम करत असतात.*

हे काम पटणारे, काम सुरू रहावे असे वाटणारे आणि शक्य झाले तर सहभागी होऊ इच्छिणारेही लाखो हितचिंतक आहेत. पण *कामाची व्यस्तता आणि प्राधान्यक्रम यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या या चळवळीशी ते प्रत्यक्ष जोडून घेऊ शकत नाहीत.*

अशा *हितचिंतकांनी देणगी रुपाने या कामाशी जोडून घेण्याची विनंती आम्ही करत आहोत.*

आपण *किमान १००० रुपये देणगी देऊ शकता.* (अधिक दिल्यास आनंद आहे.) यामध्ये आपल्याला *₹ ४०० वार्षिक वर्गणीचे वार्तापत्र वर्षभर मिळेल.* (म्हणजेच प्रत्यक्षात आपण *प्रति महिना केवळ ₹ ५० याप्रमाणे वर्षभरासाठी ₹ ६००*  देणगी देता.)
ही देणगी *८० जी अंतर्गत कर सवलत* पात्र आहे.

तसेच संपूर्ण महाराष्ट्राभर दहा हजारहून अधिक वर्गणीदार असणाऱ्या *अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात आपण जाहिरातही देऊ शकता.*

आपली *देणगी किंवा जाहिरात देण्याची इच्छा असल्यास संपर्क करावा.*

संपादक,
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र,
एफ ४, कार्तिक अपार्टमेंट, 
राजर्षि शाहू नगर, सहारा चौक,
संजय नगर,
सांगली ४१६४१६
फोन / फॅक्स - ०२३३ २३१२५१२
ई मेल - ansvarta@gmail.com

जाहिरातीसाठी चेक - 'अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र' या नावाने काढावा,
तर
*८० जी अंतर्गत कर सवलत मिळण्यासाठी*
'अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र' या नावाने देणगीचा चेक काढावा.
सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतिक्षेत विवेकवादी चळवळीतील एक सामान्य कार्यकर्ता
...कृष्णात कोरे,
८६००२३०६६० / ७०५८४०१०३१

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...