●●●●●जोहार(पुर्वार्ध)●●●●●
जोहार मायबाप जोहार।माझें नाव विठनाक महार।।
सांगतो ऐका एक विचार । तो बळकट धरा किंजी मायबाप।।
गांव पांचा पाटलांचा।पंचवीस प्रजेचा।।
तेथें कारभार सहाजनांचा।तो ऐका किंजी मायबाप।।
ज्या धन्याचे पदरी शेर।त्यासी नाही कधी जोहार।।
अवघा आईजीचा कारभार।काम करिंतो किंजी मायबाप।।
आवाजीन हवाली केला गावं।धन्याचे विसरला नाव।।
तलफ आल्यावरी ठाव।कैचा किंजी मायबाप ?।।
संत एकनाथांचे जोहार प्रसिद्ध आहेत.विठनाक महार हा जोहार करत आहे.जोहार हे भारुड मोठे असल्याने याचे पुर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग केले आहेत.
पूर्वार्धात जीव या पृथ्वीतलावर आपल्याला लाभलेल्या संधीचा लाभ न घेता सहाजणांच्या ताब्यात कसा जातो,ते सांगितले आहे.
कोण आहेत हे सहाजण?अहो हे आपले सहा शत्रू आहेत.आणि ते म्हणजे काम ,क्रोध,मोह,इत्यादी.या विकारमुळे जीव त्रस्त होतो व आपल्या धन्याच नाव म्हणजेच परमेश्वराचे नाव देखील विसरतो."मग त्याला जग केव्हा व कशी येते ?"याचा विचार उत्तरार्धात संत एकनाथ महाराज करतात.
------------------------------------
●●●●●जोहार( उत्तरार्ध )●●●●●
No comments:
Post a Comment