एव्हरेस्ट जगातलं सर्वोच्च हिमशिखर.या सर्वोच्च हिमशिखरावर पोहचण्यासाठी जगात आज प्रचंड स्पर्धा सुरु आहे...
१८९३सालापासून माणसाची हि धडपड सुरु आहे.१९२१ साली ब्रिटिशांनी या हिमशिखरावर जाण्याची पहिली मोहीम आखली.
२९ मे १९५३ ला सर एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्के या दोन मानवाची पाऊले उमटली.१९५३ नंतर आजपर्यंत ६३ देशातल्या १२०० पेक्षा जास्त गिर्यारोहकांनी हे अव्हान समर्थपणे पेलले आहे. काहींनी आपला जीव गमावला आहे. काहींना निसर्गापुढे नमते घेऊन हातातोंडाशी आलेली मोहीम अर्धवट सोडून परतीच रस्ता पकडावा लागला आहे.
पण एवरेस्टने घातलेली भुरळ काही कमी होत नाही. दरवर्षी नव्या जोमाने गिर्यारोहकांचे तांडे चढाई करुन जातात आणि हे आव्हान आपल्या छातीवर घेतात.
कुठलीही एव्हरेस्ट मोहीम ही नेपाळी शेर्पा सोबत असल्याशिवाय पूर्ण होत नाही.एव्हरेस्ट वरील प्रत्येक विजयात शेर्पांचा सहभाग हा सिंहाचा असतो.तेनसिंग नंतरही अनेक शेर्पा माउंट एव्हरेस्टवर पोहचलेत.पण त्यांच्या या यशाकडे परदेशी प्रसारमध्यांनी दुर्लक्षच केल आहे.
या यादीत लोपसांग, झेंगबु,नोरबू,पासांग काजी,लखमा रिटा, अँग दोरजी,निमा रिटा,पेमा दोरजी, पेरतेंबा, या शेर्पांनी सतत तीन(३) वेळा एव्हरेस्ट गाठलं आहे.दोरजी थामे, दवताशी,सोनम,त्सेसिंग, निम दोरजी यांनी चार (४) वेळा एवरेस्ट जिंकलं आहे.सोना डेंडु, सुंगदारे,शेर्पा यांनी पाच(५) वेळा यश मिळवले आहे.लाख नुरू यानं सहा(६)वेळा तर अपा शेर्पा यान सात (७)वेळा एवरेस्ट सर केलं.
१९७३ साली एवरेस्टवर जाणार सर्वात तरुण मुलगा म्हणून १८ वर्षाच्या शांबु तमांग यान मन मिळवला आहे.तर १९१३ साली नेपाळी महिला पासांग लहामू ही सगरमाथ्यावर पोहचली.
पण या नेपाळी शेर्पाचं त्यांच्या यशाचं कौतुक झालं नाही.त्यांची दखल समाचार पत्रांनी घेतली नाही.एव्हरेस्ट मोहिमेत विश्वविक्रम केलेला अँग रिटा हाही असाच उपेक्षित शेर्पा आहे.तेरा वर्षाच्या कारकिर्दीत तब्बल दहा (१०) वेळा त्यांन नेपाळी ध्वज सगरमाथ्यार फडकवला,तोही कृत्रिम प्राणवाय शिवाय (ऑक्सिजन सिलेंडर न वापरता).
पण तो दुर्लक्षित राहिला.कुणी त्याच्याकडं लक्ष दिल नाही.आजपासून आपण त्याची ओळख करून घेणार आहोत.यापुढील लेख मालिकेत.....
Friday, October 14, 2016
एव्हरेस्टचा बादशाह : अँग रिटा
Subscribe to:
Post Comments (Atom)
माझे नवीन लेखन
खरा सुखी
समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...
-
जागतिक ग्राहक हक्क दिन : ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय? आज जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना...
-
’एक शुन्य मी’ धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु. ल. देशपांडे. भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्र...
No comments:
Post a Comment