Friday, October 7, 2016

Kavi Indrajeet Bhalerav

This is one of the best poem i have ever heard.
Though this poem would like by everybody but to
understand and feel the poem, you need to be
farmer's daughter/son. Very very thankful to Kavi
Indrajeet Bhalerav for this immortal poem.

काट्या-कूट्याचा तुडवित रस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता
काट्या-कूट्याचा तुडवित रस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता

कशी उन्हात तळतात माणसे, कशी
मातीत मळतात माणसे,
कशी खातात जीवाला खस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता
काट्या-कूट्याचा तुडवित रस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता

काळ्या बापाचे हिरवे राण,
काळ्या मायिन पिकवले सोन
पन त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता,
माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता
काट्या-कूट्याचा तुडवित रस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता

इथे डब्यात तुला साखर लागते गोड,
तिथे शेतात माझया बापाच्या
अंगाला फोड
पण भाव ठरतो त्याला ना पुसता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता
काट्या-कूट्याचा तुडवित रस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता

जेव्हा दुष्काळ घिरट्या घाली,
तेंव्हा गावाला कुणी ना वाली
कशी सुगीत घालतात गस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता
काट्या-कूट्याचा तुडवित रस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता

ह्या भूमीचा मूळ अधिकारी,
बाप झालाय आज भिकारी
गाव असून झालाय फिरस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता

काट्या-कूट्याचा तुडवित रस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता
माज़्या गावकडे चल माज़्या दोस्ता, माज़्या गावकडे चल माज़्या
दोस्ता.........
Indrajeet Bhalerav

=============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा.
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...