*उमेदवारी_असावी_कुणाची !*
तळमळ पाहिजे समाजाची !
भावना असावी समाजसेवेची !
पद्धत असावी निस्वार्थ पणाची !
कामे करावी गरीबांची !
सत्ता नसावी नात्यागोत्यांची !
कामे करावी सर्वांची !
घमेंड नसावी पैशाची !
सवय असावी एकोप्याची !
पद्धत असावी तंटे मिटवण्याची !
भाषा नसावी काटा काढण्याची !
मैत्री असावी विरोधकाची !
लढाई व्हावी दिलदार पणाची !
किंमत राखावी जेष्ठांची !
मने जिंकावी कनिष्ठांची !
कामे फक्त नकोत
मर्जीतल्यांची !
निवडनुक व्हावी पक्या शब्दांची !
निवडून आल्यानंतर इकडुन तिकडे उड्या मारून थट्टा नसावी लोकशाहीची !
प्रामाणिकता जपावी जनतेच्या मताची !
मग गाठाल शिखरे यशाची !
नाही वेळ येणार तडजोडीची !
आणि हिंमतही होणार नाही कुणाला तुम्हाला पाडण्याची !
कामात कधीही आडवणुक करू नका कुणाची !
माणसे धरा जवळ सर्वच जाती पातीची !
मशाल पेटवा विकासाची !
भावना ठेवा बंधुत्वाची !
मग बघा तुमची क्रेज समाजातली !
सवय करा छोट्यांशीही सौजण्याने वागायची !
कष्टाने मिळवावी संपत्ती !
काधीही साथ देऊ नका भ्रष्टाचाराची !
हारलात तरी चालेल पण माणसे निवडा जीवाभावाची !
उमेदवारी असावी अशाच माणसाची !
मला वाटतं हीच कसोटी आहे सुजाण नेतृत्वाची !
नकोच उधळण पैशाची !
नकोच भीती दडपशाहीची !
हीच सनद नागरिकांची
===================================
** आम्ही असे शिकलो**
आयते शर्ट
ते बी ढगळ,
चड्डीला आमच्या
मागून ठिगळ !!
त्यावर करतो
तांब्यानी प्रेस,
तयार आमचा
शाळेचा ड्रेस !!
खताची पिशवी
स्कूल बॅग,
ओढ्याचं पाणी
वाॅटर बॅग !!
धोतराचं फडकं
आमचं टिफीन,
खिशात ठेवुन
करतो इन !!
करदोडा आमचा
असे बेल्ट,
लाकडाची चावी
होईल का फेल ?
मिरचीचा ठेचा
लोणच्याचा खार,
हाच आमचा
पोषण आहार !!
रानातला रानमेवा
भारी मौज,
अनवाणी पाय
आमचे शुज !!
काट्यांच रूतणं
दगडांची ठेच,
कसा सोडवायचा
हा सारा पेच !!
मुसळधार पाऊस
पाण्याचा कडेलोट,
पोत्याचा घोंगटा
आमचा रेनकोट !!
जुन्या पुस्तकांची
अर्धी किंमत,
शिवलेल्या वह्यांची
वेगळीच गंमत !!
पेन मागता
कांडी मिळायची,
गाईड मागण्याची
भिती वाटायची !!
केस कापण्याची
एकच शक्कल,
गप्प बसायचे
होईपर्यंत टक्कल !!
गेले ते दिवस,राहिल्या फक्त आठवणी...
=================================
रब
"रब"ने नवाजा हमें जिंदगी देकर;
और हम "शौहरत" मांगते रह गये;
जिंदगी गुजार दी शौहरत के पीछे;
फिर जीने की "मौहलत" मांगते रह गये।
ये कफन , ये जनाज़े, ये "कब्र" सिर्फ बातें हैं मेरे दोस्त ,
वरना मर तो इंसान तभी जाता है जब याद करने वाला कोई ना हो..
ये समंदर भी तेरी तरह खुदगर्ज़ निकला,
ज़िंदा थे तो तैरने न दिया और मर गए तो डूबने न दिया
क्या बात करे इस दुनिया की
"हर शख्स के अपने अफसाने हे"
जो सामने हे उसे लोग बुरा कहते हे,_
जिसको देखा नहीं उसे सब "खुदा" कहते है
===================================
एक माचिस की तिल्ली,
एक घी का लोटा,
लकड़ियों के ढेर पे
कुछ घण्टे में राख.....
बस इतनी-सी है
*आदमी की औकात !!!!*
एक बूढ़ा बाप शाम को मर गया ,
अपनी सारी ज़िन्दगी ,
परिवार के नाम कर गया।
कहीं रोने की सुगबुगाहट ,
तो कहीं फुसफुसाहट ,
अरे जल्दी ले जाओ
कौन रखेगा सारी रात...
बस इतनी-सी है
*आदमी की औकात!!!!*
मरने के बाद नीचे देखा ,
नज़ारे नज़र आ रहे थे,
मेरी मौत पे .....
कुछ लोग ज़बरदस्त,
तो कुछ ज़बरदस्ती
रो रहे थे।
नहीं रहा.. ........
चला गया..........
चार दिन करेंगे बात.........
बस इतनी-सी है
*आदमी की औकात!!!!!*
बेटा अच्छी तस्वीर बनवायेगा ,
सामने अगरबत्ती जलायेगा ,
खुश्बुदार फूलों की माला होगी ......
अखबार में
अश्रुपूरित श्रद्धांजली होगी.........
बाद में उस तस्वीर पे ,
जाले भी कौन करेगा साफ़...
बस इतनी-सी है
*आदमी की औकात !!!!!!*
जिन्दगी भर ,
मेरा- मेरा- मेरा किया....
अपने लिए कम ,
अपनों के लिए ज्यादा जीया ...
कोई न देगा साथ...
जायेगा खाली हाथ....
क्या तिनका
ले जाने की भी
है हमारी औकात ???
================================
*|| फक्त तू खचू नकोस ||*
एक डाव हरला तरी
त्यात काय एवढं ..?
कुणीतरी जिंकलंच की
हे ही नसे थोड ...
संधी मिळेल तुलाही,
लगेच हिरमसु नकोस,
*आयुष्य खुप सुंदर आहे,*
*फक्त तू खचु नकोस...*
सूर्य रोजच उगवतो,
त्याच नव्या तेजाने ...
रोज मावळतीला जातो
रोजच्याच् नेमाने ...
येणे जाणे रितच् इथली,
हे तू विसरु नकोस ...
*आयुष्य खुप सुंदर आहे,*
*फक्त तू खचु नकोस...*
प्रेम तुझ्यावर करणारे ,
कितीतरी लोक आहेत ...
तुझ्यासाठी जोडणारे ,
खुप सारे हात आहेत ...
अरे अशाच आपल्यांसाठी ,
तू ही थोड हसुन बघ ...
*आयुष्य खुप सुंदर आहे,*
*फक्त तू खचु नकोस...*
वाट तुझी बघत असतं,
रोजच कुणीतरी ...
तुझ्यासाठी जगत असतं ,
आस लावून प्रत्येक क्षणी ...
त्यांच्यासाठी तुलाही जगायचे,
अश्रु तू गाळु नकोस ...
*आयुष्य खुप सुंदर आहे,*
*फक्त तू खचु नकोस...*
उठ आणि उघडून डोळे ,
पहा जरा जगाकडे ...
प्रत्येकाच्या आयुष्यात ,
काहीतरी असतेच् थोडे ...
नाही नाही म्हणून ,
उगाच कुढत तू बसु नकोस ...
*आयुष्य खुप सुंदर आहे,*
*फक्त तू खचु नकोस...*
सामर्थ्य आहे हातात जर,
स्वप्ने डोळ्यात घेऊन चल ...
परिस्थितीशी भिडवून छाती,
दोन हात करत चल ...
विजय तुझाच असेल
तेव्हा मागे वळून बघु नकोस ...
*आयुष्य खुप सुंदर आहे,*
*फक्त तू खचु नकोस...*
*|| फक्त तू खचू नकोस ||*
=====================================
एक पिढीच आम्हाला सोडून जात आहे !
वडिलधाऱ्यांची.......
कसे वेगळेच लोक
रात्री लवकर झोपणारे
सकाळी लवकर उठणारे
पहाटे फिरावयास जाणारे
पहाटे अंगण सडा पाहणारे
बागेला पाणी देणारे
देवपूजेसाठी फुले तोडणारे
ते होते कष्टाळू
सडसडीत बांध्याचे
पूजा अर्चा करणारे
पापभिरू ......
मंदिराला जाणारे
रस्त्यात सगळ्यांना बोलणारे
सुख दुखः विचारणारे
दोन हाथ जोडून डोक्यावर नेवून नमस्कार करणारे ....
मंदिरात साष्टांग दंडवत घालणारे
आरत्यामागून आरत्या म्हणणारे
पूजा झाल्याशिवाय अन्नग्रहण न करणारे !
सोबत भाजीसाठी कापडी पिशवी......
झालर लावलेली !
मिरवीत समाधान वाचवलेल्या एक दोन रुपयाचे
त्यांचे जगच कसे सण वार ,
पै-पाहुणे ,भाजीपाला ,
कडधान्ये ,तीर्थयात्रा ,रिती रिवाज अश्या गोष्टी भोवती फिरणारे !
सेल फोन कधीच वापरता न येणारे
जुन्या फोनचेच कौतुक करणारे
पाच पन्नास फोन च्या डायऱ्या बाळगणारे
आणि नेहमीच चूक नंबर फिरवणारे
आणि चुकून नंबर लागलेल्या नातेवाईकाला.....
तास भर बोलणारे !
दिवस भरात तीन चार वर्तमानपत्रे वाचणारे
विको वज्रदंती आणि मंजन वापरणारे
अंगाला नेहमी बाम चा वास
नेहमीच एकादश्या अन व्रत वैकल्ये
देवावर अन चांगुलपणावर
प्रचंड विश्वास ठेवणारे
कस आखुन दिल्यासारखी
काटेकोर आयुष्य जगणारे
समाजाची भीती बाळगणारे
सायकल चालवणारे
जुन्या चपला खिळे ठोकून
वर्षानु वर्षे वापरणारे
सदरा आखूड होईल म्हणून
लांब शिवणारे
सणावाराला अत्तर लावणारे
डिंकाचे लाडू खाणारे
उन्हाळ्यात लोणचे घालणारे
द्रुष्ट काढणारे
अन भाजीवाल्याशी भावावरून
हुज्जत घालणारे
पानपुडा बाळगून पान लावून खाणारे
वर्षातून मोजकेच सिनेमे पाहणारे
हे सगळे लोक हळू हळू
सोडून जात आहेत
आणि...
त्यांच्यासोबत जाणार एक महत्वाची गोष्ट
ती म्हणजे “समाधानी आयुष्य ’’ !
==================================
*जगण्याचं सूत्र चुकतंय का ?*
* * * * * * * * * * * * * * * *
माणूस काही अहंकार
सोडायला तयार नाही
जगण्याचं " सूत्र " चुकतंय
पण खोडायला तयार नाही
भाऊ काय बहीण काय
नुसता फापट पसारा
कोण कोणाला विचारतय
कुणालाही विचारा
कुणी कोणाकडे जाई नं
कुणी कुणाकडे येई नं
जगलात काय मेलात काय
माया कुणाला येई नं
संवेदनशीलता आता
फारशी कुठं दिसत नाही
बैठकीत किंवा वसरीवर
गप्पाची मैफिल बसत नाही
पॅकेज, इनक्रिमेंट, सॅलरी
इन्व्हेस्टमेंट, विकएन्ड
यातच हल्ली माणसाचा
होत आहे the end
Luxury मधे लोळतांना
फाटकं गाव नको वाटतं
जवळचं नातं असलं तरी
सांगायलाही नको वाटतं
उच्च शिक्षित असूनही
माणूस आज mad वाटतं
इंटेरियर केलेल्या घरामधे
लुगडं, धोतर odd वाटतं
सगळेच पाहुणे सगळेच मेव्हणे
कसे काय posh असतील
पार्लर मधून आणल्या सारखे
चिकणे चोपडे कसे दिसतील
उन्हा तान्हात तळणारी
माणसं काळी पडणारच
गरीबीन गांजल्यावर
चेहऱ्याचा रंग उडणारच
कुरूप ते नाहीत
कुरूप तू झालास
प्रेम नात्यावर करायचं सोडून
दिसण्याला भुलून गेलास
काळी असो गोरी असो
माय ही माय असते
बाप स्वतःला गाडून घेतो
म्हणून तुझी मजा असते
पात्र कितीही मोठं झालं
तरी गंगेच मूळ विसरू नये
सुख असो का दुःख असो
आपल्या माणसाला विसरू नये
दिसण्यावर प्रेम करू नकोस
आपलं समजून जवळ घे
एरव्ही नाही आलास तरी
दिवाळीला तरी घरी ये
कॉम्पुटरच्या भाषा खूप शिकलास माणसावर प्रेम करायचं शिक
नाहीतर मानसिक आरोग्यासाठी
दारोदार मागत फिरशील भीक
दुसऱ्याचा छळ करून
तुम्ही सुखी होणार नाही
पॅकेज कितीही मोठं असू द्या
जगण्यात मजा येणार नाही
जग जवळ करतांना
आपली माणसं तोडू नका
अमृताच्या घड्याला
अविचाराने लाथाडू नका..!
*मी का बोलू?*
*मी का फोन करू?*
*मी का कमीपणा घेऊ?*
*मी का नमते घेऊ?*
*मी का नेहमी समजून घ्यायचं?*
*मी काय कमी आहे का?"*
असे बरेच सारे "मी" आहेत जे आयुष्यात विष कालवतात
म्हणून , मी पणा सोडा व नाती जोडा !! ...
==================================
☝एक गंमत सांगू तुला ...?
लहानपणी चणे फ़ुटाणे खूप आवडायचे खायला..
पण दहा पैसेही परवडायचे नाहीत खिशाला..
म्हातारपणी रुपयांनी खिसा भरला
पण मोडके दात बघून चणे लागले चिडवायला...
एक गंमत सांगू तुला ...?
लहानपणी वाटायचं,
नविन पुस्तके हवीत वाचायला..
पण चोरुन, लपुन,उसनी मित्रांची पुस्तके घेवून अभ्यास पूर्ण केला..
म्हातारपणी नवीन पुस्तकांचा ढीग येवून पडला
पण तो पर्यंत चष्म्याचा नंबर सोडावाँटर झाला...
एक गंमत सांगू तुला ....?
लहानपणी रिक्षातून आवडायचे फ़िरायला
पण सव्वा रुपायासुध्दा नसायचा कनवटीला..
म्हातारपणी ड्रायव्हर म्हणतो गाडी तयार आहे, चला फ़िरायला
पण जीना उतरेस्तवर
पाय लागतात लटपटायला...
एक गंमत सांगू तुला .....?
लहानपणी 10✘10 ची खोली होती रहायला,
दमून भागून आलो की क्षणात लागायचो घोरायला..
म्हातारपणी चार खोल्यांचा मोठा ब्लाँक घेतला,
पण एकेक खोली आ वासून येते खायला...
एक गंमत सांगू तुला ......?
खूप शिकून मुलगा अमेरिकेला गेला,
फ़ार फ़ार आनंद झाला पण भिती वाटते मनाला..
मृत्युसमयी येईल का तो पाणी द्यायला,
का ई-मेलवरच शोकसंदेश पाठवेल आपल्या आईला.
म्हणून म्हणतो मित्रांनो......आताच जगणं शिका.
आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगा...
ज्या क्षणी तुम्ही मरण पावता,
त्या क्षणी तुमची ओळख एक
बॉडी ' बनुन जाते
,'बॉडीला' आणा , बॉडीला झोपवा ,
लोक तुमच्या नावाने सुद्धा हाक मारत नाही.
म्हणूनआव्हाने स्वीकारा,
आवडत्या गोष्टीसाठी ख़र्च करा,
आवडत्या लोकांना वेळ दया
पोट दुखेपर्यन्त हसा, कोणी बालीश म्हणाले तरी चालेल.
मनसोक्त नाचा,लग्नात, वरातीत.जिथे भेटेल तिथे नाचा
अगदी लहान बाळासारख़ जगा.
कारण,
'मृत्यु' हा जीवनतला सर्वात मोठा लॉस नाहिये , लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला "जिवंतपणा"मेलेला असतो.
============================================================================= जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा E-mail करा.
आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !
No comments:
Post a Comment