Thursday, August 31, 2017

शाहूचरित्र ....काय शिकविते ?? ( भाग २४ )

शाहूराजा हा आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा राजा होता. श्रध्दाळू जरुर होते पण अंधश्रध्दाळू नव्हते . श्रध्दा होती ती डोळस होती. म्हणून तर कर्मकांड नाकारून हा राजा श्रध्देने जगत राहीलाच पण त्याहूनही मोठे म्हणजे कर्मकांडातील फोलपणा जाहीरपणे उघड करु लागला. भोंदू व स्वार्थी हितसंबधी लोक ही केवळ आपले प्रजाजन आहेत म्हणून त्यांची गय केली नाही. स्वतः अंधश्रध्देला बळी न पडता उलट असा आदर्श घालून दिला की पुढील कित्येक पिढ्या कायमची शाहूराजाची याद राखतील. असाच एक कायमचा स्मरणात राहिलसा प्रसंग ...

*जुन्या राजवाड्यातील रेकाँर्डला आग लागली. ही आग विझवायाला इतरांबरोबर स्वतः शाहूराजाही प्रयत्न करीत होते. आग विझून गेल्यावर सकाळी वाड्याच्या आसपास च्या घरावर व भिंतीवर रक्ताची बोटे उठलेली दिसू लागली. ही बातमी महाराजांच्या कानावर गेली. संस्थानातील भटी पिलावळ " महाराज , हे दुश्चिन्ह आहे , मोठी आपत्ती येण्याआधी देवाचे शांतवन केले पाहिजे " असे सांगू लागली. हे शांतवन करण्याची परवानगी महाराजांनी द्यावी असा आग्रह धरु लागली . महाराजांनी योग्य ते मनोमन ताडले.महाराजांनी विचारले " संकट येऊ नये म्हणून तुम्ही देवाचे शांतवन करणार , पण शांतवन केल्यानंतर संकट आल तर मी तुम्हाला सर्वाना जबाबदार धरून तुमच्या पायात बेड्या ठोकीन. आहात कबुल ??" .सगळे भटजी हँ हँ करत दात काढू लागले. महाराजांनी स्पष्ट बजावले " जा , हा फसवण्याचा धंदा बंद करा आता ".....काय दिसून येते यातून ?? शाहूराजा हा आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा राजा होता हे स्पष्ट होते. आजकाल ज्या प्रकारचे युक्तिवाद आम्ही परिवर्तन वादी चळवळीतील कार्यकर्ते करतो तसाच युक्तिवाद शंभर वर्षापूर्वी शाहूराजा करत होता. यालाच तर म्हणतात " वैचारिक वारसा." जो शाहूराजा स्वतः आग विझवायला धावत येतो तो राजा आपली अक्कल भटीजनापुढे गहाण टाकणारच नाही. कारण तो पठडीतला अथवा चाकोरीतला राजा नव्हता , तर आपल्या नवीन विचाराच्या चौकटी आपल्या कृतीशील आचाराने बनवणारा होता.*

शाहूराजाची ही दृष्टी शतांशानेही आमच्या सध्याचे राज्यकर्ते अंगात बाळगू शकले तरीही जनता त्यांच्या कायमच्या ऋणात राहील. पण हे होईल का ?? मला तर नाही वाटत. कारण सोयीपुरते " शाहूराजा की जय " अशी घोषणा देणारे राज्यकर्ते प्रत्यक्षात शाहूविचार राबवत नाहीत. खरे तर आजकालची हीच नवी भटी पिलावळ आहे. अशा सर्वसामान्य रयतेला लुटणारे भटी पिलावळीपासून बुद्धी चातुर्याने दूर रहा...हेच तर शाहूचरित्र सांगते

*!! अक्कल गहाण ठेवू नका...नुसता जयजयकार करु नका...धरा विचाराची कास ..लागू द्या परिवर्तनाची आस !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

Wednesday, August 30, 2017

शाहूचरित्र ...काय सांगते ?? ( भाग २३ )

शाहूचरित्र वाचताना महाराजांची विलक्षण बुद्धीमत्ता सतत ध्यानात येते. एखाद्या वाईटालाही चांगले कसे बनवावे याचा वस्तुपाठ म्हणून शाहूचरित्र आहे. एकाच वेळी इतक्या सारे हिकमती हा राजा कसे काय करत होता हे एकटे त्यालाच ठाऊक . विलक्षण बुध्दीमत्तेला , रयतेच्या हिताची कळकळ नेहमीच जोडलेली असायची. एकटे अथवा स्वतः पुरती पाहण्याचा संकुचित स्वभाव शाहूराजाचा नव्हता. अवमानालाही विधायक रुप देऊन जनकल्याण कसे करावे याची शाहूचरित्र मधील ही एक गोष्ट ...

*तिकोटा...ठिकाणी महाराज शिकारीकरता गेले. कुरुदवाडकर पटवर्धन महाराजांच्या नावाने जळत. महाराज त्याच्या हद्दीत उतरले असताना साधा भेटण्याचा शिष्टाचारही त्यांनी जाणीवपूर्वक पाळला नाही. विचारपूस करायला अंमलदाला , कारभारी , फौजदार कुणीच आले नाहीत. महाराजांनी हा अवमान बोलून दाखवला नाही. त्या भागात लोकाशी विचारपूस करताना पाण्याची टंचाई आहे असे कळले. शिकार करून चाळीसभर काळवीट महाराजांनी मारले. तिथून थेट विजापूरला जाऊन मोठे मोठे हंडे व भरपूर पत्रावळी विकत घेऊन आले. आसपासच्या खेड्याना घोडेस्वार पाठवून सर्व लोकांना जेवायच आमंत्रण दिले. पंगती सुरु झाल्या. खुद्द महाराज आपल्या हातांनी लोकांना वाढू लागले. पुलावा व मांसाचा आहार आग्रह करून महाराज स्वतः वाढत होते. जेवण झाल्यावर प्रत्येक प्रमुखाला बोलवून पटका व धोतरजोडी दिली. पाण्याची टंचाई दूर होण्यासाठी विहीर बांधण्यासाठी देणग्या दिल्या. " आमचा राजा शाहू छत्रपती " अशा घौषणा स्वयंस्फुर्तीने लोकांनी दिल्या.महाराजांचा हा " प्रताप " कुरुंदवाडकराचे कानावर गेला. आपली रयत शाहूराजाचे गुणगान गातेय हे ऐकून झक मारत महाराजांच्या भेटीला आले.....बघा , किती छोटी गोष्ट पण किती मोठा आशय भयलेला आहे. स्वतःचा वैयक्तिक अवमान समजून महाराज तसेच पुढे चालते झाले असते तर त्या गौरगरीब रयतेच्या पोटी आनंदाचे दोन घास पडले असते ?? पाण्याचा प्रश्न सुटला असता ?? नाही. शाहूराजा म्हणून तर थोर आहे. वैयक्तिक अवमानाला विधायक बनवून कायमची अद्दल कुरुंदवाडकराना घाडवणारा शाहूराजा म्हणून तर ग्रेट...*

आपण सर्वानीच ह्या पासून शिकायला हवे. अवमान हा वैयक्तिक घेऊन जनहित दूर लोटण्याचा मुर्खपणा आपण करु नये. उलट अवमान हीच संधी समजून , त्याला विधायक वळण देऊन समोरच्याला कायमचे अद्दल घडवण्याचे कौशल्य अंगात बाणवावे लागेल....शाहूचरित्र हेच तर सांगते

*!! अपमान गिळा...पण विधायक मार्गाने बाहेर काढा !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५
==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

Tuesday, August 29, 2017

ये बारिश की बूंदे

आज बहोत जोर की बारिश हो रही है।
बरसती बूंदों ने शायद सभी सडकोपर पानी की दीवार खड़ी की है। हर किसीको तकलीफ है, हर कोई बेहाल है। कोस रहा हो शायद इस बारिश को। क्यो न कोसे ? आखिर दिन भर काम करने के बाद हर किसीको अपने घर जाने की जल्दबाजी होती तो हैं ना। पर बारिश के पानी ने तो जैसे रास्ता रूख लेने की ठान ही ली है। उपरसे समुद्र पे भरती का समय है।तो जो पानी रास्तो पर जमा हुवा है ,वो समुन्दरमे जा नही रहा है। यही वजा है कि सारे रास्ते बंद हो गए है। मानो सबकुछ अपनी जगह जम सा गया हो। 26 जुले 2007 की पुराने यादें को इस बारिश ने फिरसे जगा दिया।

आज बारिश ने प्रत्येक व्यक्ति को "मुम्बईकर" बना दिया है
अब कोई मराठी नहीं है ...
कोई  यूपी वाला भैया नहीं। और
कोई भी हिन्दू नहीं है ...
कोई मुस्लिम नहीं

बरसात में भिगनेवाले लोग ...
बरसात की मुसीबत में फंसे लोग  ...
और वो लोग जो हर किसी की मदद कर रहे हैं .....
आज सारे के सारे मुम्बईकर ही तो है।

कल बारिश को रुक जाएगी देगा ...
यह सुबह एक नया जोश जीवन मे भर देगी... सबकुछ ठीक हो जाएगा ...
सिर्फ एक बात हमेशा दिल मे कायम रखो दोस्तो  ...
इस बारिशने जो दिल मे नमी दी हैं ।हमे जातिपाति से बढ़कर एकबार फिरसे इंसान बनाया है। एक दुसरेकी मदत करने की जो भावना मन मे जगाई है। उसे हमेशा याद रखना।

कही हमे फिरसे एक दूसरे को सहारा देने के लिए बारिश का इंतजार करना न पड़े।

=============================================

संपादक की डेस्क से

यदि आप के पास हिंदी, अंग्रेजी, या मराठी भाषा मे कोई  लेख, कहानी, या  कविता है। जिसे आप publish  करना चाहते है। तो कृपया आपकी कहानी आपके फोटो के साथ हमें भेज दिजिये । हमारा ईमेल आईडी है: swapnwel@rediffmail.com और उस कहानी,लेख ,कविता को हम आपके नाम और फ़ोटो के साथ ही  इस ब्लॉग पर publish कर देंगे।

         तो दोस्तो लिखना सुरु कीजिये।हम आपकी राह देख रहे है।

 धन्यवाद !!!!!!!!

तीन प्रश्न ?

विख्यात रूसी साहित्यकार “टालस्टाय” अपनी कहानी “तीन प्रश्न” में लिखते हैं कि किसी राजा के मन में तीन प्रश्न अक्सर उठा करते थे जिनके उत्तर पाने के लिए वह अत्यंत अधीर था इसलिए उसने अपने राज्यमंत्री से परामर्श किया और अपने सभासदों की एक बैठक बुलाई | राजा ने उस सभा में जो अपने तीनों प्रश्न सबके सम्मुख रखे ; वे थे —
1. सबसे महत्त्वपूर्ण कार्य क्या होता है ?
2. परामर्श के लिए सबसे महत्त्वपूर्ण व्यक्ति कौन होता है ?
3. किसी भी निश्चित कार्य को करने का महत्त्वपूर्ण समय कौन सा होता है?
कोई भी राजा के प्रश्नों का संतोषजनक उत्तर न दे पाया लेकिन उस सभा में राजा को एक ऐसे सन्यासी के बारे में पता चला जो सुदूर जंगल में एक कुटिया में रहते थे और सबकी जिज्ञासा का समाधान करने में समर्थ थे | राजा भी साधारण वेष में अपने कुछ सैनिकों एवं गुप्तचरों को साथ लेकर चल दिया उस सन्यासी के दर्शनों के लिए | दिल में एक ही आस थी कि अब उसे अपने प्रश्नों के उत्तर अवश्य ही मिल जायेंगे | जब वे सब सन्यासी की कुटिया के समीप पहुंचे तो राजा ने अपने सभी सैनकों एवं गुप्तचरों को कुटिया से दूर रहने का आदेश दिया और स्वयं अकेले ही आगे बढ़ने लगा |
        राजा ने देखा कि अपनी कुटिया के समीप ही सन्यासी खेत में कुदाल चला रहे हैं | कुछ ही क्षणों में उनकी दृष्टि राजा पर पड़ी | कुदाल चलाते-चलाते ही उन्होंने राजा से उसके आने का कारण पूछा और राजा ने भी बड़े आदर से अपने वही तीनों प्रश्न सन्यासी को निवेदित कर दिए | राजा अपने प्रश्नों के उत्तर की प्रतीक्षा करने लगा लेकिन यह क्या ? साधु ने तो उत्तर देने की बजाय राजा को उसकी कुदाल लेने का संकेत कर डाला और राजा भी कुदाल लेकर खेत जोतने लगा | आख़िरकार राजा को अपने प्रश्नों के उत्तर भी तो चाहिए थे |
          राजा के खेत जोतते- जोतते संध्या हो गयी |इतने में ही एक घायल व्यक्ति जो खून से लथपथ था और जिसके पेट से खून की धार बह रही थी ,उस सन्यासी की शरण लेने आया | अब सन्यासी एवं राजा दोनों ने मिलकर उस घायल की मरहम पट्टी की | दर्द से कुछ राहत मिली तो घायल सो गया |प्रातः जब वह घायल आगंतुक राजा से क्षमायाचना करने लगा तो राजा के आश्चर्य का ठिकाना न रहा | आगन्तुक राजा की स्थिति देख तत्काल अपना परिचय देते हुए बोला –“कल तक आपको मैं अपना घोर शत्रु मानता था क्योंकि आपने मेरे भाई को फाँसी की सज़ा दी थी | बदले का अवसर ढूढ़ता रहता था | कल मुझे पता लग गया था कि आप साधारण वेषभूषा में इस साधु के पास आये हैं | आपको मारने के उद्देश्य से मैं यहाँ आया था और एक झाड़ी के पीछे छिपकर बैठा था लेकिन आपके गुप्तचर मुझे पहचान गये और घातक हथियारों से मुझे चोट पहुँचाई लेकिन आपने अपना शत्रु होने के बावजूद भी मेरे प्राणों की रक्षा की | परिणामतः मेरे मन का द्वेष समाप्त हो गया है | अब मैं आपके चरणों का सेवक बन गया हूँ | आप चाहे दण्ड दें अथवा मुझे क्षमादान दें, यह आपकी इच्छा |”
        घायल की बात सुनकर राजा स्तब्ध रह गया और मन ही मन इस अप्रत्याशित ईश्वरीय सहयोग के लिए के लये प्रभु का धन्यवाद करने लगा | सन्यासी मुस्कराया और राजा से कहने लगा –“राजन्, क्या अभी भी आपको अपने प्रश्नों के उत्तर नहीं मिले ?”
     राजा कुछ दुविधा में दिखाई दे रहा था इसलिए सन्यासी ने ही बात आगे बढ़ाई – ‘आपके पहले प्रश्न का उत्तर है —सबसे महत्त्वपूर्ण कार्य वही होता है जो हमारे सामने होताहै ; जैसे आपने मुझे खेत जोतने में सहयोग दिया | यदि आप मुझे सहानुभूति न दिखाते तो आपके जीवन की रक्षा न हो पाती ।
आपका दूसरा प्रश्न था कि परामर्श के लिए कौन महत्त्वपूर्ण होता है जिसका उत्तर आपको स्वयं ही मिल चुका है कि जो व्यक्ति हमारे पास उपस्थित होता है , उसी से परामर्श मायने रखता है | जैसे उस घायल व्यक्ति को सहायता की आवश्यकता थी जिसके प्राण आपने बचाये | इस तरह आपका शत्रु भी आपका मित्र बन गया ।
तीसरे प्रश्न का उत्तर यही है कि किसी भी निश्चित कार्य को करने का महत्त्वपूर्ण समय होता है “अभी” |
मित्रो, महान् रूसी साहित्यकार टालस्टाय की यह कहानी हमें सावधान करती है कि वर्तमान के महत्त्व को कभी भी नहीं भूलना चाहिए | भविष्य की चिंता में वर्तमान यदि बिगड़ गया तो हम हाथ ही मलते रह जायेंगे | प्रस्तुत कार्य को मनोयोग से करना अथवा समय का सदुपयोग ही न केवल उज्ज्वल भविष्य की संभावनाओं की नींव होता है अपितु यही सर्वांगीण प्रगति का मूलमंत्र भी है |
=============================================
संपादक की डेस्क से
यदि आप के पास हिंदी, अंग्रेजी, या मराठी भाषा मे कोई  लेख, कहानी, या  कविता है। जिसे आप publish  करना चाहते है। तो कृपया आपकी कहानी आपके फोटो के साथ हमें भेज दिजिये । हमारा ईमेल आईडी है: swapnwel@rediffmail.com और उस कहानी,लेख ,कविता को हम आपके नाम और फ़ोटो के साथ ही  इस ब्लॉग पर publish कर देंगे।
         तो दोस्तो लिखना सुरु कीजिये।हम आपकी राह देख रहे है।
 धन्यवाद !!!!!!!!

Monday, August 28, 2017

शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग २२ )

एक आगळ्यावेगळ्या पण चांगल्या रसायनांचे मिश्रण म्हणजे शाहूराजा . राजा असूनही सुधारकी वृत्ती कृतीशीलपणे अंगी बाळगणारा हा मुलुखावेगळा राजा. आपल्या कार्याचे महत्त्व जसे हा शाहूराजा जाणता होता तसेच त्या अंगीकृत कार्याला होणारा उघड सुप्त विरोध जाणून होता.परिवर्तन सहजासहजी समाजाच्या अंतरंगात घडत नसते तसेच ते घडू नये म्हणून हितसंबंधी लोक या मार्गात सतत काटे रचत असतात. राजा असला म्हणून काही शाहूराजाची गय केली जाणार नव्हती हे पक्के ओळखणारे शाहूराजा होते. पाहूया अशीच एक हकीकत ...

*महाराजांच्या पदरी असणारा माहुत यशवंत हत्तीस चंदी देत होता. महाराजांनी सहज विचारलं काय चारतोस म्हणून .त्याबरोबर माहुताने मोठ्या तांदळाचा कण महाराजांपुढे धरला. ही चंदी चारतो असे बोलला. हे ऐकून महाराजांनी लागलेच आपल्या जामदारास बोलवले व सांगितले की , " आजपासून आमच्या जेवणाकरता याच तांदळाचा भात करत जा ". सत्यवादीकार बाबुराव यादव हे महाराजासमवेत होते. त्यांनी " असे का बौलता ? असा प्रश्न केला. त्यावर महाराज उत्तरले " या ब्राम्हणी कारस्थानामुळे देवी अहिल्याबाईना , प्रतापसिंह महाराजाना , आमचे वडील शिवाजी महाराज यांना कल्पनातीत त्रास झाला. आम्हालाही या ब्राम्हणी कारस्थानामुळे कदाचित तुरुंगात जाण्याचा प्रसंग आला तर तिथे जिरगे तांदूळ मिळणार नाहीत. हा मोठा तांदूळ तेथे खावा लागेल. म्हणून आत्तापासूनच तशी सवय ठेवलेली बरी ".....काय बोलावे या लोकराजाला. " एकवेळ राजगादी सोडेन पण बहुजन उध्दाराचे काम सोडणार नाही " असे उद्गार म्हणून तर शाहूराजा बोलत असे. आपल्या अंगीकृत कार्यावार निष्ठा व्यक्त करतनाच शाहूराजा त्या कामाचे परिणाम जाणून जबाबदारीही स्विकारतो. " परिणामाची भिती बाळगून आपल्या अंगीकृत कामाशी द्रोह करायचा नाही " अशीच यामागची रास्त वृत्ती आहे.*

एकेकदा खरंच असे वाटते की शाहू हे राजे होते की समाजवादी ?? सगळ्या समाजवादी लोकांचा पुढारी शोभावा असे महाराज होते. तत्व आणि व्यवहार यात फारकत न करणारा शाहूराजा म्हणून तर आदर्श आहे. परिणामाला घाबरुन जर पाय मागृ खेचले असते तर बहुजन समाजाची गुलामी सुटणे केवळ अशक्य होते. " परिणामाला न घाबरता , जबाबदारी स्विकारून आपले,अंगीकृत ध्येयाची वाटचाल करा " ...शाहूचरित्र हेच तर शिकवते

*!! शाहूराजा , तुझी थोरवी गावी किती ...नाव घेताच तुझे , आदराने मस्तक अनंत झुकती !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

अंनिस हिंदूधर्मविरोधी आहे काय ?

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि तब्बल चार वर्षे उलटूनही त्यांचे मारेकरी व सूत्रधार ह्यांना गडाआड करण्यात शासनाकडून होत असलेल्या अक्षम्य दिरंगाईबाबत शासनाला जाब विचारण्यासाठी अंनिसने 20 जुलै ते 20 ऑगस्ट या दरम्यान राज्यव्यापी 'जवाब दो' आंदोलन छेडले होते. त्या दरम्यान, पुरोगामी महाराष्ट्र आणि  प्रतिगामी महाराष्ट्र यांच्यामध्ये सुरु असलेल्या वैचारिक लढाईच्या पार्श्वभूमीवर "धर्माची चिकित्सा करणाऱ्यांच्याच हत्या का होतात ?" असा प्रश्न मी सोशल मिडियावर विचारला होता. ज्यावर अनेक मित्रांनी विविध आक्षेप घेतले. त्यामध्ये 'अंनिस हिंदु धर्मालाच विरोध का करते, इतर धर्मांबाबत का बोलत नाही ?' हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. त्याला उत्तर म्हणून मी सदर लेख लिहीला आहे.

आक्षेप : अंनिस केवळ हिंदु धर्माची चिकित्सा करते, हिंदूंहून अधिक धर्मांध असलेल्या अन्य धर्मांबाबत बोलत नाही. अर्थातच अंनिस ही हिंदूविरोधी संघटना असून हिंदु धर्मविरुद्धच्या एका व्यापक कटाचा भाग आहे वगैरे.

उत्तर : माझ्या निरिक्षणाप्रमाणे प्रश्नकर्त्यांच्या मनात *हिंदु धर्म* म्हणजे काय ह्याबाबतच मोठा गोंधळ असतो. म्हणूनच अंनिस हिंदु विरोधी आहे म्हणजे नमके कशाच्या विरोधी आहे, हेच त्यांना सांगता येत नाही. *धर्म म्हणजे जीवनपद्धती* हे साधारणतः मान्य असणारे मत वादासाठी ग्राह्य मानले तर जीवनपद्धती ही दोन प्रकारची असू शकते.
*1. धर्मग्रंथांवर आधारित*
*2. भौतिक परिस्थितीवर आधारित*
वरील दोन्ही प्रकारात मनुष्याचे हित केंद्रस्थानी असते, असे मानले जाते. तर प्रश्नकर्त्यांना 'अंनिस हिंदूविरोधी आहे' असे म्हणताना *धर्म म्हणजे 'धर्मग्रंथांवर आधारित जीवनपद्धती'* हे मत मान्य असल्यास ह्या मुद्यावर अंनिसवर टिका करण्याची त्यांची भूमिका हिंदुहिताची नाही, असेच म्हणावे लागेल. कारण मनुष्याच्या भोवतालची परिस्थिती निरंतर बदलत असते. त्यामुळे अर्थातच त्याच्या गरजाही बदलत असतात.   त्या बदलत्या गरजांना अनुरुप त्याची जीवनपद्धती असेल तरच तो आपले अधिकाधिक ऐहिक हित साधू शकतो. जीवन संघर्षात  सुरक्षित राहू शकतो व सुखाने, सन्मानाने जगू शकतो. कारण मनुष्याचे जीवन हे अस्थिर असते, सतत बदलत असते; परंतू धर्मग्रंथ हे अपरिवर्तनीय असतात. धर्मग्रंथातील अनेक नीतिनियम आज लोकशाही मूल्यांच्या चौकटीत अनैतिक व टाकाऊ ठरलेले आहेत. म्हणूनच प्रवाही असणाऱ्या काळासोबत आपल्या जीवनव्यवहारांची यथायोग्य सांगड घालून त्याला जगावयाचे असेल तर धर्माग्रंथाधारित जीवनपद्धती त्याज्य मानणे आज अपरिहार्य आहे. भारतीय संविधान ती त्याज्य मानते. आणि महाराष्ट्र अंनिस याबाबत संपूर्णपणे संविधानाशी सहमत आहे. ह्या ठिकाणी हिंदुह्रदयसम्राट स्वा. सावरकर ह्यांचे मत उध्रुत करणे उचीत ठरेल. ते म्हणतात, *'धर्मग्रंथांवर आपल्या समाजजीवनाचा डोलारा उभा करण्याचे दिवस आता गेले. तुम्हाला प्रगत व सम्रुद्ध व्हावयाचे असेल तर विज्ञानाची कास धरण्याला पर्याय नाही. धर्मग्रंथ हे ऐतिहासिक ग्रंथ म्हणून आदरपूर्वक संग्रहालयात ठेऊन विज्ञानाचे पान उलटले पाहिजे. धर्मग्रंथांचा अधिकार 'काल काय झाले?' हे सांगण्यापुरताच. आज काय योग्य ते सांगण्याचा अधिकार प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगक्षम विज्ञानाचा !'*
सावरकरांच्या ह्या अनुभवसिद्ध व अभ्यासपूर्ण विधानावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही.

किंवा

जर 'अंनिस हिंदूविरोधी आहे' असे म्हणताना प्रश्नकर्त्यांना *धर्म म्हणजे भौतिक परिस्थितीवर आधारित जीवनपद्धती* हा अर्थ अपेक्षित असेल तरीही अंनिस हिंदुविरोधी आहे हा त्यांचा दावा ते सिद्ध करु शकत नाहीत. कारण आज त्यांच्या मताप्रमाणे *भौतिक परिस्थितीवर आधारित (?)*असलेल्या प्रस्थापित हिंदु धर्मामध्ये अनेक तर्कविसंगती, शोषण, अघोरी अंधश्रद्धा, मनुष्यहितास मारक अशा अनेक चालिरीती रुढ आहेत. ज्या चालिरीती चूकीच्या व हानिकारक वाटल्यामुळे महाराष्ट्र अंनिस त्या चालिरीतींना अधिक कालसुसंगत पर्याय देत आहे. जे पर्याय समाज व शासनही स्विकारत आहे. उदा. गणेशोत्सवामध्ये प्लैस्टर ऑफ पैरीस च्या गणेशमूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण थांबावे म्हणून अंनिसने मातीच्या मूर्तिंचा किंवा कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या मूर्तिंचा आग्रह धरला, तसेच त्या मूर्त्या नदी/तलाव/समुद्रात विसर्जित करण्यापेक्षा क्रुत्रिम तलावामध्ये विसर्जित करण्याचे आवाहन केले. ज्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ठिकठिकाणी अनेक लोकांनी व गणेशोत्सव मंडळांनी त्याप्रमाणे मूर्ती बनवून घेतल्या व अनेकांनी त्या क्रुत्रिम तलावामध्ये विसर्जितही केल्या ! सर्वात महत्वाचे म्हणजे त्याकरिता ठिकठिकाणी महानगरपालिकांनीच क्रुत्रिम तलावांची व हौदांची सुविधा उपलब्ध करुन दिली. गेल्या वर्षी तर दस्तुरखुद्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच 'वर्षा'तील गणपतीचे क्रुत्रिम हौदात विसर्जन करुन अंनिसच्या पुरोगामी विचारांना थेटपणे मान्यता दिली !
तसेच हिंदु धर्मामध्ये रुजलेल्या जातपंचायतीच्या क्रुर व समांतर न्यायव्यवस्था संपविण्यासाठी अंनिसने राज्यभर *जातपंचायतींना मुठमाती अभियान* राबवून जनजागृती केली. समितीने एकीकडे लोकसहभागातून नैर्बंधिक (कायदेशीर) कारवाई सुरु ठेवली  तर दुसरीकडे जातपंचायतींच्या पंचांच्या चांगुलपणाला साद घालून संवादावर भर दिला; अशा प्रकारे दुहेरी प्रयत्नांतून हा लढा पुढे नेला. ज्याला यश येऊन अनेक ठिकाणी लोकांनी स्वतःहून जातपंचायती बरखास्त केल्या ! तसेच अत्यंत महत्वाची बाब म्हणजे अंनिसच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देऊन अलिकडेच राज्य शासनाने *सामाजिक बहिष्कार विरोधी निर्बंध (कायदा)* संमत केला. ज्याद्वारे मनमानी पद्धतीने समांतर न्यायव्यवस्था चालविणे यापुढे जातपंचायतींना अशक्य होऊन बसणार आहे.
तसेच डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर तातडीने वटहुकूम काढून राज्य शासनाने *जादुटोणाविरोधी निर्बंध (कायदा)* महाराष्ट्रात लागू केला; ज्यासाठी अंनिसला तब्बल *18 वर्षे संघर्ष* करावा लागला. ज्या संघर्षादरम्यान कोणत्याही धर्माच्या ठेकेदारांनी त्या लढ्याला  सहकार्य तर केले नाहीच, उलट त्यांनीच ह्या निर्बंधाविरोधी तो हिंदुविरोधी असल्याची हाकाटी पिटून त्याला सतत विरोध केला. *तुम्ही वारीला गेलात तर तुम्हाला अटक होईल, तुम्ही सत्यनारायण घातला तर तुम्हाला तुरुंगात डांबले जाईल* अशा प्रकारच्या *खोट्या अफवा* पसरवून येणकेनप्रकारेण अतिशय सुस्पष्ट तरतुदी असणारा हा निर्बंध विधीमंडळात संमत होऊ नये म्हणून त्यांनी सर्वशक्तीनिशी प्रयत्न केले. परंतू अंतिमतः पुरोगामी विचारच विजयी झाला. ( *लक्षणीय बाब ही की त्या निर्बंधामध्ये कुठेही जात वा धर्माचा उल्लेख नाही!*) आज वस्तुस्थिती ही आहे की गेल्या चार वर्षांमध्ये जादुटोणाविरोधी निर्बंधाखाली सुमारे 350 हून अधिक केसेस दाखल करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये अनेक भोंदु मुस्लिम बाबा-मांत्रिकांवरही कारवाई झालेली आहे. काही ठिकाणी तर सदर निर्बंधाला विरोध करणाऱ्या काही हिंदु धार्मिक संघटनांशी संबंधित लोकांनीच काही मुस्लिम बुवाबाबांच्या विरोधात तक्रारी करुन त्यांना अटक करविण्यास मदत केली ! हे अंनिसच्या कामाचे मोठेच यश मानले पाहिजे.
या व्यतिरिक्त वटपौर्णिमेमध्ये  वटपूजनाच्या तर्कशून्य प्रथेला  पर्याय म्हणून व्रुक्षारोपणाचा पर्यावरण पुरक पर्याय देणे, दिवाळीमध्ये प्रचंड प्रमाणात वायुप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांऐवजी, ते न करता बचत केलेल्या पैशाचा विनियोग शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी करणे किंवा गरजू मुलांना ते साहित्य भेट देणे, *ईदेला*अंधश्रद्धेतून प्रचंड प्रमाणात केल्या जाणाऱ्या  पशुहत्येला पर्याय म्हणून *रक्तदान शिबीर* आयोजित करण्याचे उपक्रम राबविणे, धुळीवंदनमध्ये घातक केमिकल पासून बनविता येणारे ओले रंग न वापरता कोरड्या रंगांचा वापर करण्याचे आवाहन करणे, होळीमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयुक्त इंधन व पोळ्या न जाळता *होळी लहान करा.. पोळी दान करा* ह्या अत्यंत रास्त उपक्रमाचा पुरस्कार करणे व त्याअंतर्गत गरिब व गरजू लोकांना पोळ्या देऊन वेगळ्या व सकारात्मक पद्धतीने सण साजरा करणे, 31st सारख्या दिवशी व्यसनांचा दिसून येणारा चढता ज्वर लक्षात घेऊन व्यसनमुक्तीचा भाग म्हणून *द दारुचा नाही तर द दुधाचा* हा उपक्रम राबवून व्यसनांचा विधायक पद्धतीने निषेध करणे असे अनेक लोकहिताचे ( *हिंदुहिताचे*) उपक्रम समिती राबवत असते. जे हिंदुंच्या हिताचे नाहीत, असे डोके शाबूत असणारा कोणीही हिंदू व्यक्ती म्हणू शकत नाही.
   अशा प्रकारे अंनिस नेहमीच लोकहिताच्या द्रुष्टीने प्रस्थापित व बऱ्याच प्रमाणात शोषक व कालबाह्य चालिरीतींना अधिक  कालसुसंगत पर्याय देऊन समाजाला विवेकाची व मानवतेची दिशा दाखविण्याचे कार्य करीत असते. परंतू अशा  प्रत्येक वेळी धर्माचे ठेकेदार त्यांना *हिंदु धर्मावरील हल्ला* म्हणून विरोध करीत असतात. अंनिस हिंदु धर्माच्याच मागे हात धुवून लागली आहे, मुस्लिम-ख्रिश्चन आदिंच्या अंधश्रद्धांबद्दल ते काहीही बोलत नाहीत, हिंदु धर्म नष्ट करुन हिंदुंची एकी तोडून हिंदु शधर्म खिळखिळा करण्याचा त्यांचा कट आहे, ते भ्रष्टाचारी आहेत असे निरनिराळे खोटे आरोप करुन सर्वसामान्य देवभोळ्या लोकांना ते भ्रमित करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा वेळी हिंदु तरुणांनी आवर्जून लक्षात घेण्याची बाब ही, की *अंनिस हिंदुविरोधी असल्याची बोंब ठोकणारे व अंनिसला अहिंदुंचे प्रबोधन करण्याचे सल्ले देणारे धर्माचे ठेकेदार स्वतः मात्र हिंदुंच्या कोणत्याही महत्वाच्या प्रश्नांना हात घालताना दिसत नाहीत की कोणत्याही प्रकारचे समाजप्रबोधनाचे कार्यही करीत नाहीत !* तेव्हा हिंदुहिताबाबत स्वतः निष्क्रिय असताना अंनिसच्या सक्रीयतेवर प्रश्न उपस्थित करण्याचा नैतिक अधिकार तरी ह्यांना आहे काय, असा प्रश्न हिंदु तरुणांनी त्यांना  विचारायला हवा. 
  थोडक्यात, भौतिक परिस्थितीवर आधारीत अधिक चांगल्या व कालोचित जीवनपद्धतीकडे अंनिस समाजाला नेत असताना तो हिंदू किंवा कोणत्याही धर्मावरील हल्ला कसा ठरु शकतो ? भौतिक परिस्थितीवर आधारित अधिक चांगली जीवनपद्धती कोणती हे ठरविण्यासाठी प्रस्थापित जीवनपद्धतीची चिकित्सा करणे अपरिहार्यच ठरते. परंतू अशा वेळी हिंदु धर्मरक्षणाचा दावा करणारे हे ठेकेदार, आमच्या धर्मावर प्रश्न उपस्थित कराल तर खबरदार.. असे म्हणून, तर कधी 'तुम्ही आमच्याच धर्माची चिकित्सा का करता' असे म्हणून धर्मचिकित्सेला नकार देत असतात. त्यामुळे त्यांना हिंदुहितापेक्षा लोकांनी अज्ञानी राहिल्यामुळे अबाधित राहू शकणाऱ्या त्यांच्या जातीय, आर्थिक नि राजकीय हितसंबंधांचीच अधिक काळजी असते हे सिद्ध होते. *खऱ्या धर्माला विचारांची भीती नसते* हे स्पष्ट करताना विनोबा एके ठिकाणी म्हणतात, की *"खुप विचार करा. आडवे तिडवे चारही बाजूने विचार करा. धर्माला विचारांची कात्री लावा. विचाररुपी कात्रीने जो धर्म कातरला जाईल तो कुचकामी होता असे समजा. तुझ्या कात्रीने जो तुटणार नाही, उलट तुझी कात्रीच जेथे तुटून पडेल तोच खरा धर्म माना !"*

'अंनिस हिंदुविरोधी आहे' असे म्हणणाऱ्या मित्रांच्या मनामध्ये हिंदु धर्म म्हणजे काय ह्याबाबतच गोंधळ असतो. कारण लोकांना धर्माबाबत सतत भावनिक पातळीवर ठेवल्यामुळे *धर्म म्हणजे त्या विशिष्ट धर्मातील लोकांच्या हिताचा प्रश्न*, ह्या द्रुष्टीने त्यांनी कधी विचारच केलेला नसतो ! परंतू त्यांनी धर्माचा कोणताही अर्थ लक्षात घेतला तरी अंनिस हिंदुविरोधी असल्याचा त्यांचा आरोप कसा खोटा पडतो, ते आपण पाहिले.
आता वरील आक्षेपातील 'अंनिस अन्य धर्मांची चिकित्सा करीत नाही किंवा त्यांच्याबाबत मुग गिळून गप्प बसते' हा आरोप करणाऱ्यांची मानसिकता समजून घेण्यापूर्वी वरील दाव्यात खरेच काही तथ्य आहे काय, ते आपण तपासून पाहू.

खरे तर *अंधश्रद्धा ह्या श्रद्धेच्या क्षेत्रातील काळाबाजार असतो.* आणि काळाबाजार करणाऱ्याची जात वा धर्म पाहायचा नसतो. अंनिसही ते  पाहात नाही. अंनिसकडे आलेली किंवा अंनिस कार्यकर्त्यांनी स्वतः दखल घेतलेली अहिंदुंतील अनेक प्रकरणे समितीने हाताळली आहेत. अंनिसच्या वार्तापत्रांमध्ये किंवा डॉ. दाभोलकरांच्या विविध ग्रंथांमध्ये ठिकठिकाणी आपल्याला ती उदाहरणे आढळून येतात. अलिकडेच अंनिसने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रातील गेल्या 25 वर्षांतील निवडक लेखांचे प्रत्येकी सुमारे 200 पानांची 5 पुस्तके असलेले 3 खंड प्रसिद्ध केले आहेत. त्यातील पहिल्या खंडातील "बुवाबाबांचा पर्दाफाश आणि भांडाफोड" या पुस्तकात इस्लाम व ख्रिश्चन धर्मातील बाबाबुवांनाही समितीने कसे उघडे पाडले त्याविषयीचे लेख आहेत.
त्यातील काही लेखांची नावे खालिलप्रमाणे...
1) आणि हाजीमलंग पळाला (पान 13) 
2) मांत्रिक मौलाना शेख (पान 17)
3) येशूचा बाप्पा (पान 34)
4) अस्लमबाबाचा अद्भुत दवाखाना (पान 55)
5) मुजावर बाबा (पान 60)
6) पैगंबर शेख बनला दशावतार (पान 68)
7) गुलशन साईजीची बुवाबाजी (पान 78)
8) सुफी सिकंदर शाह बाबाचा पर्दाफाश (पान 113)
9) मौलविचा महिलेवर बलात्कार (पान 139)
10) पिराबाबा कसा झाला भोंदू बाबा ? (पान 154)

तसेच अलिकडच्या काळातील ट्रिपल तलाकचा प्रश्न असो, प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदुषणाबाबतच्या विधानांमुळे विशेषतः चर्चेत आलेल्या मुस्लिमांचा *अजानचा प्रश्न* असो, मुस्लिम महिलांच्या प्रश्नांबाबत मुल्लामौलवींचे वर्चस्व झुगारुन स्वतःच्या न्याय्य हक्कांसाठी धर्माची चौकट मोडून न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची हिंमत दाखविणाऱ्या जिगरबाज महिलांबाबत समाजामध्ये व प्रसारमाध्यमांमध्ये सुरु असलेल्या चर्चा असो महाराष्ट्र अंनिसने वेळोवेळी त्याची दखल घेऊन आपल्या वार्तापत्रामध्ये त्याबाबत  भूमिका घेतलेली आहे.

  परंतू तरीही अंनिसने हाताळलेल्या अनेक प्रकरणांपैकी बहुतेक प्रकरणे ही हिंदु धर्माशी संबंधित आहेत, असे आपल्याला आढळून येईल. परंतू त्याला सार्थ कारणेही आहेत.
1. पहिली गोष्ट म्हणजे साल 2001 व 2011 च्या राष्ट्रीय जनगणनेनूसार हिंदु व मुस्लिमांची लोकसंख्या अनुक्रमे सरासरी 80% आणि 13 ते 14% होती. म्हणजे आपल्या देशामध्ये अंधश्रद्धांची 10 पैकी 8 प्रकरणे ही हिंदुंचीच असणार. आणि हिंदु व मुस्लिमातील धर्मसुधारणांच्या चळवळींचे प्रमाण पाहता  स्वाभाविकपणे अंनिसमध्ये 10 पैकी किमान 9 कार्यकर्ते हे हिंदूच असणार. शिवाय आपल्याकडे साधारणपणे विशिष्ट जात व धर्मातील रुढी-परंपरांबाबत त्या जाती-धर्माबाहेरील व्यक्तीने बोललेले रुचत नसल्यामुळे बहुसंख्येने असलेले हिंदु कार्यकर्ते बहुधा हिंदुच्याच अंधश्रद्धांबाबत बोलताना दिसतात.

2. हिंदु धर्म आणि इतर धर्म ह्यात जाती-पोटजाती, धर्मग्रंथ, सणोत्सव, देवदेवता यांच्या संख्येच्या बाबतीत दिसून येणारा फरक लक्षणीय आहे. त्यामुळे अर्थातच इतर धर्मांच्या तुलनेत अनेक जाती, त्यांचे अनेक देवदेवता वा अवतार, त्यांच्यासाठी केल्या जाणाऱ्या अनेक पूजाविधी वा कर्मकांड अशा ह्या अनुकूल स्थितीत हिंदु धर्मात अंधश्रद्धेचे अमाप पिक उगवले नसते तरच नवल !
त्यामुळे जिथे अंधश्रद्धा अधिक, तुलनेने परिवर्तनवादी विचाराचे कार्यकर्ते अधिक, त्या त्या समाजातील लोकांनीच तेथील अंधश्रद्धांबाबत बोलले पाहिजे ही मानसिकता बलवत्तर तिथे ह्या सर्व बाबींची एकूण परिणती  हिंदुंतील अंधश्रद्धा निर्मूलनावर अधिक काम होण्यात झाली तर ते स्वाभाविकच म्हणायला हवे.

तरीही वादापुरते असे मानले की अंनिस ही केवल हिंदुंचे अंधश्रद्धा निर्मूलन करते, तर प्रश्न असा निर्माण होतो की अंधश्रद्धा निर्मूलनच मुळात चांगले की वाईट ?
अ) *चांगले असेल तर* ते आपल्या धर्माचे होण्यात अडचण काय ?
ब) *वाईट असेल तर* ते कोणाचेही होता कामा नये. जी गोष्ट अनिष्ठ म्हणून आपल्या धर्माबाबत होऊ नये, परंतू परधर्माबाबत व्हावी असा आपला आग्रह असेल, तर आपल्या मनामध्ये परधर्मियांप्रती द्वेष ठासून भरलेला आहे, हे तरी मान्य करावे लागेल.

तसेच हिंदुंच्या अंधश्रद्धा निर्मूलनाला विरोध असण्याचे आणखी एक कारण असते, ते म्हणजे हिंदुंच्या अंधश्रद्धा नाहीशा झाल्या तर ते नेभळट बनतील, संघटित राहणार नाहीत. परंतू अंधश्रद्धा निर्मूलन न झाल्यामुळे मुसलमान मात्र कडवेच राहतील, पोथिनिष्ठ राहिल्यामुळे त्यांचा एकजीवपणा, एकजूटपणा व  बळकटी कायम राहील. आणि जेव्हा केव्हा या देशात हिंदु-मुसलमान संघर्ष होईल, तेव्हा कट्टर मुसलमान नेभळट हिंदुंचा पराभव केल्यावाचून राहणार नाहीत.

खरे तर ह्या आक्षेपाला दाभोलकरांच्या अनेक वर्षे आधी सावरकरांनीच अत्यंत तर्कशुद्ध व समर्पक उत्तर देऊन ठेवले आहे. मुसलमानांच्या देवभोळेपणामुळे नि धर्मवेडेपणामुळे त्यांचे काय कल्याण झाले आहे असा थेट प्रश्न विचारुन, आज हिंदुस्थानातही ते विद्येत मागासलेले आहेत. अज्ञान, दारिद्रय नि कुपमंडुकता यांनी हिंदुंपेक्षाही ते अधिक ग्रासलेले आहेत ह्या वस्तुस्थितीकडे हिंदु समाजाचे त्यांनी लक्ष्य वेधले.  सावरकर म्हणतात, की *"मुसलमानांनी जे समाज त्यांच्याहून असंघटित नि धर्मभोळे होते, त्यांच्यावर धर्मवेडाने विजय त्यांनी मिळविले असतील. परंतू ऐहीकद्रुष्ट्या अधिक संघटित समाजाशी त्यांची गाठ पडली तेव्हा मुसलमानांची पारलौकिक पोथीनिष्ठा त्यांना मुळीच उपयोगी पडली नाही. ....युरोपच्या विज्ञानबळापुढे ज्याअर्थी मुसलमानांच्या धर्मवेडाचे काहीएक चालत नाही. ज्याअर्थी बुद्धीनिष्ठा, प्रगतीस पारखे झाल्यामुळे त्यांचा समाज आज हिंदु समाजापेक्षाही अज्ञान, दारिद्रय, अवनती यांच्या तावडीत सापडलेला आहे. आणि ज्याअर्थी आम्हास जे तोंड द्यावयाचे आहे, ते विज्ञानयुगास नि युरोपीय विज्ञानबळासच द्यावयाचे आहे. त्याअर्थी मुस्लिम एक पोथिनिष्ठ आहेत म्हणून आम्ही सवाई पोथिनिष्ठ व्हावे, ते देवभोळे आहेत म्हणून आम्ही सवाई देवभोळे व्हावे हा काही आमच्या अभ्युन्नतीचा उपाय नव्हे. अनुकरणच जर करावयाचे असेल तर आज मुस्लिमांनाही जी पुरुन उरली आहे त्या युरोपच्या विज्ञाननिष्ठतेचेच अनुकरण करा. देवभोळेपणाचे सारे ताईत, ताविज, शिव्या आणि शाप ज्या कवचावर चालू शकत नाही, ते आज इंग्लंड, रशिया, जर्मनीत धडधडीत प्रत्ययास येत आहे; ते विज्ञान कवचच आम्ही धारण केले पाहिजे !"*

   आपल्या अनेक सुधारकांनी नि विचारवंतांनी विज्ञानयुगाकडे बोट दाखवून अद्ययावत व्हा असा वेदमंत्र दिलेला असतानाही, आजही अनेक हिंदु तरुण आपल्याला पोथीवादी धर्माकडे नेऊन स्थितीवादी बनवू पाहणाऱ्या सनातन्यांच्या षडयंत्रास बळी पडत आहेत, हे अतिशय दुर्दैवी आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळेच आज हिंदु समाज पतित झालेला आहे. सत्यशोधनाची व्रुत्ती समाजामध्ये रुजली नसल्याचेच ते द्योतक आहे. धर्माचे ठेकेदार आपल्याला धर्माच्या भ्रामक संकल्पनांमध्ये गुंतवून अज्ञानी व हिंसक ठेऊ पाहात आहेत, हे त्यांच्या अद्यापही लक्षात येत नाही. एकीकडे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग जवळ येत असताना दुसरीकडे संस्कृती रक्षणाच्या नावाखाली हिंदु समाजामध्ये संकुचित विचार रुजवू पाहणाऱ्या चळवळी करुन हिंदु तरुणांना आपल्या जुन्या व बऱ्याच प्रमाणात कालबाह्य ठरलेल्या रुढीपरंपरांचा दुराभिमान बाळगावयास शिकवून जगातील अन्य संस्क्रुतींपासून त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करु पाहणाऱ्या स्वयंघोषित संस्कृती रक्षकांबाबत पूज्य साने गुरुजी म्हणतात, की *" नवीन विचारांचे वारे येऊ नयेत म्हणून सनातनी नावाची मंडळी किल्ले-कोट बांधू पाहात आहेत. परंतू हे संस्कृतीरक्षक नसून संस्कृतीभक्षक आहेत. भारतीय संस्कृतीची भव्य इमारत नवीन विचारांच्या वाऱ्याने पडेल, अशी का या संस्कृतीरक्षकांना भीती वाटते ? या नवीन विचारांच्या वाऱ्यांनी जर ती पडण्यासारखी असेल, तर ती टिकण्यात तरी अर्थ काय ? जे नेहमी नवीन नवीन स्वरुप प्रकट करील तेच टिकेल. ज्या झाडाला नवीन पालवी फुटेनाशी झाली, ते झाड मरणार असे समजावे."*

मित्रांनो.. व्यक्तीस्वातंत्र्य हा आधुनिक जगाचा प्राण आहे. जे लोक धर्माच्या नावाने आपले विचार इतरांवर लादू पाहतील, पोथीवादी व प्रश्नशून्य धर्माचे मढे कवटाळू पाहतील, समाजाने त्यांचे विचार नाहीच स्विकारले तर हिंसाचाराचा मार्ग पत्करतील,  त्यांचा पराभव निश्चित आहे.
आज अंधश्रद्धा निर्मूलन समिती लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा महामंत्र देऊन विचारी व विवेकी बनवू पाहात आहे. आज जे जे उपयुक्त आहे, मनुष्यहिताचे आहे ते ते स्वतः आचरुन विचारार्थ समाजापुढे ठेवीत आहे. लोकही ते स्विकारत आहेत. त्यामुळेच लोक विचारी, विवेकी बनल्याने ज्या ज्या लोकांची दुकाने बंद होणार आहेत, त्यांच्या पोटात अंनिसच्या कामामुळे भीतीचा गोळा उठला आहे. म्हणूनच ते नाना प्रकारे अंनिसला बदनाम करण्याचे कटकारस्थान करीत आहेत. लोकांनी त्यांचे कारस्थान समजून घ्यावे ह्याकरिता माझी सर्व मित्रांना नम्र विनंती आहे की त्यांनी सोशल मिडियावर येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीवरुन अंनिसबद्दल मत न बनविता, अंनिसचे मासिक, डॉ. दाभोलकरांची पुस्तके, भाषणे यांचा अभ्यास करुन किंवा प्रत्यक्ष अंनिसच्या शाखांमध्ये जाऊन अंनिसचे विचार व ध्येयधोरणे समजून घ्यावीत. धन्यवाद !

विवेकाचा आवाज बुलंद करुया

  आपला मित्र
    मिलिंद यशवंत पाटील (असीम) भिवंडी
     संपर्क : 9028570845

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...