Wednesday, August 9, 2017

शाहू चरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ८ )

  नाटक - सिनेमा ही माध्यम समाजमनावर बराच परिणाम गाजवत असतात हे वास्तव आहे. यामध्ये चांगला प्रभाव कमी व वाईट जास्त असा प्रकार असतो. या नाटक व सिनेमा माध्यमातून जेव्हा ऐतिहासिक पात्र उभे केले जाते तेव्हा बरेच वादविवाद होत असतात. कलाकृती करणारा आपले हितसंबंध जपत असतो व हे करताना बरेचदा इतरांवर अन्याय करत असतो. कलेच्या माध्यमातून आपले हितसंबंध जपताना " कलाकृती ही कलाकृती म्हणून पहावी , इतिहास म्हणून नव्हे " असा इशारा ही मंडळी देतात खरे परंतु समाजमन मात्र तो इशारा ध्यानात घेत नाही. इतिहास समजून घेण्यासाठी अस्सल कागदपत्रे पाहून लिहिलेला तटस्थ इतिहास वाचण्याचे कष्ट घेण्याऐवजी नाटक सिनेमात सांगातलेले सगळं खरं मानण्याची प्रवृत्ती फारच मोठी आहे. म्हणून या माध्यमावर विशेष नजर असावी लागते. शाहूराजांची अशी नजर सांगणारी एक गोष्ट सांगतो.

शेक्सपियर...हा जगातील सर्वोत्तम नाटककार. हँम्लेट हे नाटक त्याचे सर्वोच्च नाटक समजले जाते. रंगभूमीवर काम करणाऱ्या प्रत्येक नटाला हँम्लेट आयुष्यात एकदा तरी करावा अशी ओढ असते. शाहूराजांनी राज्याभिषेकप्रसंगी काही नाटके पाहिली. गणपतराव जोशी यांचा हँम्लेट नाटकाचा खेळ शाहूराजानी दोन वेळा पाहिला. हँम्लेटची भुमिका गणपतराव "लांब शेंडी" राखून करत. एके दिवशी काय कळ फिरली अन् कुठून फिरली...कंपनीच्या ठिकाणी गणपतराव न्हाव्यापुढे बसले असता पाठमोरे होऊन वासुदेवराव केळकर यांनी त्यांची शेंडी कापून टाकली. गणपतराव शेंडी कापलेची तक्रार घेऊन महाराजाकडे गेले. महाराज म्हणाले " आरं गण्या , आरं त्यो हँम्लेट काय बामणाच्या पोटचा हुता काय ? त्यावेळेपासून रंगमंचावर हँम्लेट बोडक्याने अर्थात बिनशेंडीचा दिसू लागला. नीट आकलन केले तर यात काय मर्म हाती लागते ?? ऐतिहासिक म्हणणारे नाटकातून आपल्याला आवश्यक हितसंबंध राखणारा एक मोठा वर्ग असतो. चरीत्रनायकाची तोडफोड करून आपणांस हवा तो इतिहास आपल्या या माध्यमातून मांडणारी स्वार्थी माणसं आपणांस ठाऊक आहेत. अलिकडेच म्हणजे साधारणपणे साठ वर्षापूर्वी संभाजीराजे व शिवराय यांच्या चरित्रवर नाटक व सिनेमातून बरेच वादग्रस्त लिखाण झाले. बदनामी झाली. महाराष्ट्र कित्येकदा ढवळून निघालाय. सेन्सॉर म्हणवणारे केंद्र चिकित्सक अभ्यास करत नसल्याने इतिहास बिघडवणारी कलाकृती प्रचाराच्या जोरावर हिट केल्या जातात. सामान्य माणूस तोच इतिहास खरा म्हणून सांगत सुटतै. परिणाम ..चरित्र नायकावर अन्याय होत राहतो व पुढे सत्यनिष्ठ इतिहास संशोधक जेव्हा खरा इतिहास सांगतात तेव्हा समाजात वादविवाद झडतात. सेन्सॉर बौर्डाला शाहूराजासारखी दुरदृष्टी असायला हवी. त्याकरिता इतिहास अभ्यास , समाजमनाचा अभ्यास , इतिहासाशी प्रामाणिकपणा असे गुण असायला हवेत. हे सारे होत म्हणून तर हँम्लेटची शेंडी कापली गेली. महाराज किती गांभीर्याने कलाकृती पाहत असत व चिकीत्सक वृत्तीचे दर्शन यातून दिसते.

शाहूराजानी जे करून दाखवल ते करणारे हात आज नाहीत. म्हणून तर ऐतिहासिक पात्रांना चारित्र्यहनन बिनदिक्कत केले जाते. लाभ उठवाणारे उठवतात मात्र समाज वादंगाच्या कात्रीत कायमचा अडकतो. तो सापडू नये असे वाटत असेल तर शाहूचरित्र नीट आकलावे लागृल हेच खरं ..

!! कलाकृतीवर प्रेम करा ....पण चिकीत्सक होऊन !!

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५

शाहू चरित्र ...काय शिकवते ?? या लेखमालिकेतील सर्व लेख फक्त एका क्लिक वर .
शाहू चरित्र ...काय शिकवते ?? ( भाग १ )

शाहू चरित्र ...काय शिकवते ?? ( भाग २ )

शाहू चरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ३ )

शाहू चरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ४ )

शाहू चरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ५ )

शाहू चरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ६ )

शाहू चरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ७ )

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...