भुकेल्या पोटी असणाऱ्या माणसाला तुम्ही धर्म शिकवायला गेलात तर तो धर्म त्याच्या पचनी पडणार नाही ...साधारणपणे अशा आशयाचे वाक्य स्वामी विवेकानंद यांनी काढले होते. आधी पोटोबा मग विठोबा हे अगदी खरं आहे. शिक्षण हे तरी या आशयापासून कस लांब राहील ? शिक्षण घेणाऱ्या मुलाचे पोट भरले असेल तरच त्याचे लक्ष शिक्षणात लागेल अन्यथा पोटाची भूक त्याला कासावीस करून टाकेल. मानवी जीवनाचे हे सत्य आपणांस बरेच जणांना ठाऊक असते परंतु त्या दिशेने काही ठोस पावले उचलली जात नाहीत हे दुःखकारक आहे. साधारणपणे शंभर वर्षापूर्वी शाहूराजांनी हे सत्य आकलन केलेच व त्यावर विधायक कृती केली. चला , त्यासंबंधी जाणून घेऊ या....
शालेय पोषण आहार....हा अगदी अलिकडच्या काळातील लोकांना माहिती झालेला प्रकार आहे. शाळेत जाणाऱ्या मुलामुलीना दुपारच्या वेळेत पोटभर अन्न देणारी ही व्यवस्था अत्यंत योग्य आहे. शाहूराजे हे काळाच्या पुढचा विचार करणारा माणूस. कृष्णाजी मोरे ( माजी खासदार ) यांनी शाहूराजासंबधी ही गोष्ट नोंद केलीय. मूळचे मांग समाजाचे कृष्णाजी हे सोनतळी कँपवर शाहूराजांना भेटून " मला शिकायच आहे " अस बोलले. महाराजांनी लगेचच त्या लहान कृष्णाला गाडीत घेतले. गाडी कँपचे कोपऱ्यावर आली असताना मुदपाकघर अर्थात स्वयंपाकघर अथवा खानावळीजवळ थांबली. महाराज आत जाऊन सारी व्यवस्था बघून आले. चार पाच खानसामे जमा झाले. बाहेर पडताना महाराज दरडावले " लक्षात ठेवा , शिक्षण घेणारे एक देखील मुलगा उपाशी राहिला तर तुमची चामडी लोळवीन ". कृष्णाजी आपल्या आठवणीत नोंदवतात कि त्या मुदपाकखान्यातून संस्थानात शिक्षण घेणाऱ्या गरीब मुलामुलीना सकाळी व रात्री दोन भाकरी / भाजी मोफत मिळत असे. या नोंदीतुन " खरं सत्य " काय दिसून येते ?? मला असे वाटते की , मुलांच्या पोटाचा प्रश्न मिटवणे हे आपले आद्य कर्तव्य महाराजांनी मानले. पहिल्यांदा जगता आल पाहिजे आणि मग आणखी योग्य जगण्याकरता शिक्षण हाताशी हवे हा खरी मानवता जागवणारा गाभा शाहूराजा कृतीत आणत होता. शालेय पोषण आहार हा प्रकार एकविसाव्या शतकात आपणांस कळाला तो विसाव्या शतकात शाहूराजा आचरत होता. आपण काय शिकावे यातून ?? शालेय पोषण आहाराशी संबंधित लोकांनी शाहूराजाचे धोरण घ्यावे. मुदपाकखान्यात जाऊन व्यवस्था पाहणारा शाहूराजा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपला व्यवहार तसा करावा. सरकारने पोषण आहार संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना शाहूराजासारखे दरडवायाला हवे. जो पोरगा शाहूराजाकडे शिक्षण मागायला पुढे आला तोच मुलगा शिक्षण घेऊन पुढे खासदार झाला. आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांनी या नोंदी नोंदवून ठेवल्या.
शाहूराजाची धोरणे आजही प्रस्तुत आहेत. फक्त ती अवलंबताना हृदय शाहूराजाचे हवे. इच्छाशक्ती असायला हवी. भुकेचि गरज जाणून घेऊन मग विद्यामृत पाजणारा हा राजा म्हणून तर प्रत्येकाच्या काळजात अभेद्य घर करून राहीला. माणसाच पोट शांत करा आणि मग त्याला जे पाजयचय ते अमृत पाजा...शाहूचरित्र हे दाखवून देते.
!! भुकेल्याचे पोट भरून करावा...खरा सदाचार !!
उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५
शाहू चरित्र ...काय शिकवते ?? या लेखमालिकेतील सर्व लेख फक्त एका क्लिक वर .
शाहू चरित्र ...काय शिकवते ?? ( भाग १ )
शाहू चरित्र ...काय शिकवते ?? ( भाग २ )
शाहू चरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ३ )
शाहू चरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ४ )
शाहू चरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ५ )
शाहू चरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ६ )
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks !
No comments:
Post a Comment