Monday, August 28, 2017

शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग २२ )

एक आगळ्यावेगळ्या पण चांगल्या रसायनांचे मिश्रण म्हणजे शाहूराजा . राजा असूनही सुधारकी वृत्ती कृतीशीलपणे अंगी बाळगणारा हा मुलुखावेगळा राजा. आपल्या कार्याचे महत्त्व जसे हा शाहूराजा जाणता होता तसेच त्या अंगीकृत कार्याला होणारा उघड सुप्त विरोध जाणून होता.परिवर्तन सहजासहजी समाजाच्या अंतरंगात घडत नसते तसेच ते घडू नये म्हणून हितसंबंधी लोक या मार्गात सतत काटे रचत असतात. राजा असला म्हणून काही शाहूराजाची गय केली जाणार नव्हती हे पक्के ओळखणारे शाहूराजा होते. पाहूया अशीच एक हकीकत ...

*महाराजांच्या पदरी असणारा माहुत यशवंत हत्तीस चंदी देत होता. महाराजांनी सहज विचारलं काय चारतोस म्हणून .त्याबरोबर माहुताने मोठ्या तांदळाचा कण महाराजांपुढे धरला. ही चंदी चारतो असे बोलला. हे ऐकून महाराजांनी लागलेच आपल्या जामदारास बोलवले व सांगितले की , " आजपासून आमच्या जेवणाकरता याच तांदळाचा भात करत जा ". सत्यवादीकार बाबुराव यादव हे महाराजासमवेत होते. त्यांनी " असे का बौलता ? असा प्रश्न केला. त्यावर महाराज उत्तरले " या ब्राम्हणी कारस्थानामुळे देवी अहिल्याबाईना , प्रतापसिंह महाराजाना , आमचे वडील शिवाजी महाराज यांना कल्पनातीत त्रास झाला. आम्हालाही या ब्राम्हणी कारस्थानामुळे कदाचित तुरुंगात जाण्याचा प्रसंग आला तर तिथे जिरगे तांदूळ मिळणार नाहीत. हा मोठा तांदूळ तेथे खावा लागेल. म्हणून आत्तापासूनच तशी सवय ठेवलेली बरी ".....काय बोलावे या लोकराजाला. " एकवेळ राजगादी सोडेन पण बहुजन उध्दाराचे काम सोडणार नाही " असे उद्गार म्हणून तर शाहूराजा बोलत असे. आपल्या अंगीकृत कार्यावार निष्ठा व्यक्त करतनाच शाहूराजा त्या कामाचे परिणाम जाणून जबाबदारीही स्विकारतो. " परिणामाची भिती बाळगून आपल्या अंगीकृत कामाशी द्रोह करायचा नाही " अशीच यामागची रास्त वृत्ती आहे.*

एकेकदा खरंच असे वाटते की शाहू हे राजे होते की समाजवादी ?? सगळ्या समाजवादी लोकांचा पुढारी शोभावा असे महाराज होते. तत्व आणि व्यवहार यात फारकत न करणारा शाहूराजा म्हणून तर आदर्श आहे. परिणामाला घाबरुन जर पाय मागृ खेचले असते तर बहुजन समाजाची गुलामी सुटणे केवळ अशक्य होते. " परिणामाला न घाबरता , जबाबदारी स्विकारून आपले,अंगीकृत ध्येयाची वाटचाल करा " ...शाहूचरित्र हेच तर शिकवते

*!! शाहूराजा , तुझी थोरवी गावी किती ...नाव घेताच तुझे , आदराने मस्तक अनंत झुकती !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...