Thursday, August 17, 2017

शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग १३ )

शाहूराजा हा खरंच कोणत्या रसायनाने बनलाहोता कुणास ठाऊक ? खरे तर नुसता जन्म घ्यायचा म्हणून सरदार घराण्यात जन्मले परंतु कोणताही प्रचलित व्यवहार सरंजामी पध्दतीचा त्यांनी राखला नाही. गोरगरीब लोकांच्यात त्यांच्या पैकीच एक होऊन वावरण्यात कोण आनंद वाटायचा शाहूराजाला. आपली प्रजा जशी जगते तसेच आपण जगायला हवे या अत्यंत मानवतावादी विचारापर्यत शाहूराजाची विचारांची व आचाराची झेप होती हे पाहिले की नम्रपणे हात जोडले जातात. राजा म्हणवणारा हा " माणूस " घोड्याच्या पागशाळेत झोपला , महार - मांगाच्या गाठोड्यातील भाकरी हक्काने खाल्ली , गादीऐवजी घोंगाड्यावर डोके टेकून निवांत जगला. एक ना अनेक उदाहरणे देता येतील.

*एक वैशिष्ट्यपूर्ण आठवण ....१९२० साली नागपूर येथील एक परिषद करुन महाराज कोल्हापूरला परतणार होते. बन्ने नावाच्या आपल्या पी. ए. ला महाराज बोलले की " माझेही तिकीट तिसऱ्या वर्गाचे काढा. अहो , म. गांधी सारखे थोर देशभक्त व स्वातंत्र्य चळवळीचे पुढारी तिसऱ्या वर्गाने प्रवास करतात तर मग माझी एवढी बडदास्त कशाला ??" ...विशेष म्हणजे १८९५ साली महाराजांच्या प्रवासासाठी खास रेल्वे बोगी तयार केली गेली होती. त्या बोगीला " सलून " असे नाव होते. रैल्वे प्रवासावेळी बोगी रेल्वेस जोडत. पलंग, गाद्या - गिरद्या , कुशन खुर्ची , सोफा , स्वच्छतागृह अशा अद्ययावत सोयीने युक्त अशी " सलून " होती. पण आश्चर्य म्हणजे महाराज सलूनमध्ये न बसता इतर डब्यात बसत. सलूनमध्ये,शाही परिवारातील स्त्रीया बसत.,....हे उदाहरण आपल्या पुढे कोणता आदर्श उभा करते ?? राजा मग तो कुणीही असो , जोवर तो जनतेत थेटपणै मिसळत नाही , त्यांच्या सारखे जीवन जगत नाही , त्यांच्या संकटाना आपले संकट समजत नाही , सर्वात महत्त्वाचे म्हणजे ' जरी मी राजा असलो तरी तो मान मिळालाय तो य दिनदुबळ्या व गोरगरीब रयतेच्या प्रेमावर आणि विश्वासावर ही भावना जपत नाही तोवर...तोवर तो राजा हा " लोकराजा अथवा रयतेचा राजा " ठरत नाही. लोक अर्थात समाज नेहमीच कृतज्ञ असतात ते अशा जगावेगळ्या राजांच्या बाबतीत. असा जगावेगळा राजा म्हणजे शाहूराजा.*

आमचे राज्यकर्ते यापासून योग्य तै बोध घेतील तो सुदिन. नेहमी आपल्या आलिशान बंगल्यात व पाँश गाडीत फिरून बडेजाव करणारे लाखो लोकप्रतिनिधी आम जनता रोज पाहते. पण त्यांच्या प्रती कोणताही कळवळा अथवा ममत्व जनतेला नसते. कारण मूळात ते कधीच " जनतेचे प्रतिनिधी " नसतात. ते असतात आधुनिक सरंजामदार. अशांना जनतेच्या हृदयात कधीच थारा मिळत नाही ...हेच तर शाहूचरित्र दर्शविते.

*!! जनतेत मिसळून ...जनतेचे आयुष्य जगा...तरच स्थान हृदयात !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५
==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...