Thursday, August 24, 2017

शाहूचरित्र ...काय सांगते ?? ( भाग २० )

राजा असणाऱ्या माणसाला विवेकबुध्दी आवश्यक असतेच पण त्याचबरोबर महत्त्वाच्या प्रश्नावर विधायक युक्तिवाद करण्याचे कौशल्यही असावे लागते. हे जनहितार्थ केलेले युक्तिवाद भविष्यात फार मोठे परिवर्तनाच्या जागा तयार करत असतात. आजची परिवर्तनवादी चळवव बरेचदा या भूतकाळातील महामानवांनी केलेल्या विधायक कामाच्या जोरावर अवलंबून असते त्याचे कारण हेच. राजा आणि त्यातही तो आधुनिक विचारांचा लाभला तर समाज सुसंस्कृत बनायला अधिक अवकाश मिळतो. अशीच एक घटना पाहूया...

*अंबाबाई मंदीर...हे देशप्रसिध्द आहे. या मंदिरात कारंजाचे दोन हौद होते. एक हौद ब्राह्मण समाजाचा तर दुसरा ब्राम्हणेतरांचा. सत्यशोधक चळवळ ही त्याकाळी जोमात होती. दासराम ..हे सत्यशोधक समाजाचे निर्भीड कृतीशील कार्यकर्ते. माणसामाणसातील अंतर कमी करणे म्हणजे विषमता नष्ट करणे होय. हे दोन हौद म्हणजे विषमतेची नांदी व समानतेची विल्हेवाटीचे प्रतिकच होते जणू. सत्यशोधक दासरामांनी एकदा जाहीर केले की ब्राह्मण समाजाच्या वेगळ्या हौदात मी बुडी मारणार. ठरविल्याप्रमाणे दासराम यांनी " छत्रपती शाहू महाराज की जय " अशी घौषणा देत या हौदात उडी घेतली. ब्राह्मण समाज खवळला. हौद अशुद्ध झाला म्हणून गौमूत्र शिंपडून हौद शुद्ध करून घेतला. जनसामान्य हा सारा प्रकार पाहत होते. त्या महिन्यात एकादशी होती. पंचगंगा नदीवरही ब्राम्हण समजाकरता एक मोठा घाट " राखीव " होता. लोकांच्या झुंडीच्या झुंडी एकादशीला आंघोळ करण्यासाठी नदीवर पोचल्या. आणि गंमत म्हणजे राखीव असणाऱ्या ब्राम्हण घाटावरच आंघोळ करु लागले. पुन्हा ब्राम्हण वर्ग खवळला. तक्रार करण्यासाठी ते शाहूराजाकडे गेले. महाराज मोठे हूशार. त्यांनी स्पष्ट सांगितले " जशी तुम्ही हौदाची शुध्दी केली , तशीच नदीचीही करा ". ब्राम्हण समाज जे समजायच ते कळून चुकला.....ही घटना ऐतिहासिक आहे. विषमता दूर करण्यासाठी जी कृती दासरामानी केली होती तिला थेट समर्थन महाराजांनी केले होते हे दिसून येते. भेदाभेद ठेवू इच्छिणाऱ्या ब्राम्हण वर्गाला " आता माझ्या राज्यात हे थेरं चालणार नाहीत " असा सूचक पण थेट इशारा महाराज देऊन जातात.सत्यशोधक दासराम या विवेकी कृतीने इतिहासात अजरामर झालेत. शाहूराजानी विधायक कार्याला विवेकी समर्थन देत आपली ऐतिहासिक कामगिरी चोख बजावली.*

नेहमीच काही सरळ मार्गाने विधायक कार्य पार पडेल अस नाही . तर कधीकधी काही " अवचित घटना " घडवून आणावी लागते. विवेकाची अर्थात समानतेची प्रस्थापना समाजात अशा मार्गानेही होत आली आहे. आणि स्पष्ट सांगायचे तर हे मार्ग अविवेकी नव्हेत. एकाच चष्म्यातून सारे जग पाहणे म्हणजे चळवळ व रणनीती न कळण्यासारखे आहे. " आम्ही कोणते शस्त्र वापरावे हे आमचा शत्रू ठरवतो " असे लेनिन बोलला होता. शाहूचरित्र तर दुसरे काय सांगते हो...

*!! विषमता नष्ट करण्यासाठी ...काही मार्ग असतात निराळे...पण समजू नका त्यांना , विवेकी मार्गा पेक्षा ..वेगळे !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...