शाहूराजा ..नाव डोळ्यासमोर आले की आठवते ते त्यांचे रांगडेपण. एका मोठ्या हृदयाचा हा माणूस जरी पूर्वापार समजूतीने रांगडा वाटत असला तरीही शाहूराजाचे वर्तन हे नेहमीच काळाच्या एक पाऊल पुढे असेच होते. अगदी छोट्या छोट्या वाटणाऱ्या परंतु ज्याचा गर्भितार्थ फार मोठ्या सहृदय आशयाने भरलेला आहे अशा कित्येक गोष्टी शाहूचरित्र वाचताना दिसून येतात. आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय ती वाचताना तुम्हाला नक्कीच शाहूराजा बद्दल मनातला आदर व्दिगुणीत होईल यात शंका नाही. ऐका तर मग....
*हुबळी ....या ठिकाणी एका परिषदेकरता शाहूराजा गेले होते. महाराजांच्या स्वागताला पूर्ण नगरीत पताका , आंब्याच्या डहाळाचे तोरण घराला लावून हुबळीवासीय स्वागताला सज्ज होते. " शाहू महाराज की जय " ही घोषणा दुमदुमत होती. सभेच्या ठिकाणी जाण्यासाठी खास रथ सज्ज ठेवलेला होता. महाराज रथात बसले. गुलाल उधळत व वाद्य वाजवत मिरवणूक पुढे जायला लागली. महाराजांवरील अपार प्रेमाने जनतेने भारावून जाऊन महाराजांचा रथ हाताने ओढण्याची मनसुबे रचले. त्यांनी झपाटयाने रथाची घोडी सोडवायचा प्रयत्न करु लागली. महाराजांनी विचारले " घोडी का सोडताय ?" सर्वांनी एकसुरात म्हटल " महाराज , हा रथ आम्ही ओढणार " आपल्या वरील सामान्य रयतेचे प्रेम पाहून महाराज गहिवरले. तरीही स्वतःला सावरत स्पष्ट म्हणाले " रथ तुम्ही ओढणार असाल तर मी रथातून उतरुन पायी चालत येईन " महाराजाचे शब्द ऐकून सारे स्तब्ध झाले. आता काय करायचं असा विचार करत एकमेकाकडे पाहू लागले. शाहूराजा पुढे बोलला " आजपर्यत तुम्हांला जनावराप्रमाणे वागणूक मिळाली. तशीच वागणूक द्यायला मी इथे आलो नाही , तर जनावरांनाही माणसे बनवण्याकरता मी इथे आलोय " महाराजांचे शब्द ऐकून उपस्थितच्या डोळ्याना पाण्याची धार लागली.....शाहूराजा हा असा " माणसातला राजा " होता. सरंजामी पूर्णतः फेकून देऊन आपल्या रयतेत इतक्या मोठ्या प्रमाणावर विरघळलेला दुसरा राजा माझ्या ऐकिवात नाही. माणसातील हा राजा माणसासारखेच वर्तन आपल्या रयतेशी करतोय हे पाहून शाहूराजा किती महान होता हे कळते. जनावराप्रमाणे वागणूक ज्या समाजाला दिली गेली त्या समाजाचे हृदय तो आपल्या हृदयात वागवत होता. म्हणून तर हा लोकराजा होता.*
कार्ल मार्क्स आठवला. मार्क्स म्हटला होता की " माणसाला माणसाची दुःख भोगू द्या ..." या वाक्यातून आम जनते बाबतीत कळवाळा प्रतित होतोच पण रयतेशी करावयाचा " मानवीय व्यवहार " पण कळतो. शाहूराजा हा असा मानवीय व्यवहार करणारा व जपणारा होता. रथ ओढायला लावून स्वतःच्या दांभिक श्रेष्ठत्वाच्या बढाया मारणारा शाहूराजा नव्हता , तर माणसाशी माणसासारखे व्यवहार करणारा हा अलौकिक राजा होता. माणसाशी माणसाप्रमाणे व्यवहार करा..हेच शाहूचरित्र सांगते.
*!! शाहूराजा किती महान...याची सतत ठेवावी जाणं..!!*
उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks !
No comments:
Post a Comment