शाहूचरित्र वाचताना महाराजांची विलक्षण बुद्धीमत्ता सतत ध्यानात येते. एखाद्या वाईटालाही चांगले कसे बनवावे याचा वस्तुपाठ म्हणून शाहूचरित्र आहे. एकाच वेळी इतक्या सारे हिकमती हा राजा कसे काय करत होता हे एकटे त्यालाच ठाऊक . विलक्षण बुध्दीमत्तेला , रयतेच्या हिताची कळकळ नेहमीच जोडलेली असायची. एकटे अथवा स्वतः पुरती पाहण्याचा संकुचित स्वभाव शाहूराजाचा नव्हता. अवमानालाही विधायक रुप देऊन जनकल्याण कसे करावे याची शाहूचरित्र मधील ही एक गोष्ट ...
*तिकोटा...ठिकाणी महाराज शिकारीकरता गेले. कुरुदवाडकर पटवर्धन महाराजांच्या नावाने जळत. महाराज त्याच्या हद्दीत उतरले असताना साधा भेटण्याचा शिष्टाचारही त्यांनी जाणीवपूर्वक पाळला नाही. विचारपूस करायला अंमलदाला , कारभारी , फौजदार कुणीच आले नाहीत. महाराजांनी हा अवमान बोलून दाखवला नाही. त्या भागात लोकाशी विचारपूस करताना पाण्याची टंचाई आहे असे कळले. शिकार करून चाळीसभर काळवीट महाराजांनी मारले. तिथून थेट विजापूरला जाऊन मोठे मोठे हंडे व भरपूर पत्रावळी विकत घेऊन आले. आसपासच्या खेड्याना घोडेस्वार पाठवून सर्व लोकांना जेवायच आमंत्रण दिले. पंगती सुरु झाल्या. खुद्द महाराज आपल्या हातांनी लोकांना वाढू लागले. पुलावा व मांसाचा आहार आग्रह करून महाराज स्वतः वाढत होते. जेवण झाल्यावर प्रत्येक प्रमुखाला बोलवून पटका व धोतरजोडी दिली. पाण्याची टंचाई दूर होण्यासाठी विहीर बांधण्यासाठी देणग्या दिल्या. " आमचा राजा शाहू छत्रपती " अशा घौषणा स्वयंस्फुर्तीने लोकांनी दिल्या.महाराजांचा हा " प्रताप " कुरुंदवाडकराचे कानावर गेला. आपली रयत शाहूराजाचे गुणगान गातेय हे ऐकून झक मारत महाराजांच्या भेटीला आले.....बघा , किती छोटी गोष्ट पण किती मोठा आशय भयलेला आहे. स्वतःचा वैयक्तिक अवमान समजून महाराज तसेच पुढे चालते झाले असते तर त्या गौरगरीब रयतेच्या पोटी आनंदाचे दोन घास पडले असते ?? पाण्याचा प्रश्न सुटला असता ?? नाही. शाहूराजा म्हणून तर थोर आहे. वैयक्तिक अवमानाला विधायक बनवून कायमची अद्दल कुरुंदवाडकराना घाडवणारा शाहूराजा म्हणून तर ग्रेट...*
आपण सर्वानीच ह्या पासून शिकायला हवे. अवमान हा वैयक्तिक घेऊन जनहित दूर लोटण्याचा मुर्खपणा आपण करु नये. उलट अवमान हीच संधी समजून , त्याला विधायक वळण देऊन समोरच्याला कायमचे अद्दल घडवण्याचे कौशल्य अंगात बाणवावे लागेल....शाहूचरित्र हेच तर सांगते
*!! अपमान गिळा...पण विधायक मार्गाने बाहेर काढा !!*
उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks !
No comments:
Post a Comment