राजा प्रजाहितदक्ष असेल तर..प्रजा नेहमीच त्याची आठवण करते. भारतीय इतिहासात अनेक राजे महाराजे होऊन गेले परंतु हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच राजे प्रजेच्या हिताची काळजी वाहत होते. प्रजेला याची जाणीव होती. म्हणून तर चारहजार वर्षे ओलांडली तरी " इडा पीडा टळौ , बळीराजाचे राज्य येवो " अशी आळवणी केली जाते ती बळीराजाची आठवण म्हणून. सम्राट अशोकाचा कालखंड सर्वात संपन्न व वैभवशाली कालखंड गणला जातो आणि चारशे वर्षे होत आली तरी " राजे , परत या " अशी हाक फक्त रयतेचा राजा शिवछत्रपतीना दिली जाते. अगदी याचप्रमाणे कोल्हापूरच्या शाहूराजाची आठवण जपली जाते. या राजाच्या हयातीतच अशा गोष्टी दिसून आल्या. त्यापैकीच एक ....
*सर्वसामान्य रयत तसेच बुध्दीवंत यामध्ये शाहूराजे लोकप्रिय होतेच. याचबरोबर जंगलात राहणाऱ्या सामान्य आदिवासी समाजातही महाराज अत्यंत प्रिय होते. एकदा महाराज शिकारीला गेले असता महाराजांच्या जंगलातील परतीच्या वाटेवर हे आदिवासी बांधव जमले होते. हातात प्रत्येकाच्या दह्याचे लोटके होते . ह्या लोटक्यातील दही शाहूराजाला द्यावे अशी त्या सामान्य जणांची इच्छा होती. वेळ जाता जाता त्यांच्या मध्ये महाराज कोणाच्या लोटक्यातील दही खातात यावर पैज ठरली. महाराज दिसताच सगळे पुढे झाले आणि महाराजांपुढे भरलेल्या दह्याचे लोटके धरले. महाराज चाणाक्ष होते तसेच या सामान्य रयतेचे हृदय जाणणारे होते . लोटक्यातील दह्यावर धुरळा पडू नये म्हणून आदिवासीनी लंगोटीच्या पुढचा धडपा लोटक्यावर झाकला होता. महाराजांनी युक्ती केली. एक मोठा पेला मागवला. एकाच्या लोटक्यावर द्रोण झाकला होता. त्या द्रोणाचे पानं काढून प्रत्येकाच्या लोटक्यात बुडवून दह्याची एकेक कवडी पेल्यात जमा केली. आणि मग समाधानाने जमलेले सर्व दही पिऊन टाकले. सारे आदिवासी आनंदले. आपल्या राजावर इतके प्रेम करणारी जनता व त्या जनतेच्या प्रेमाचा इतक्या सुंदररित्या जपणूक करणारा राजा हे आगळवेगळ समीकरण शाहूचरित्रत आहे.....आजकालच्या आपल्या जीवनातील राज्यकर्ते वर्गातील कुणा एकालाही असा जनतेच्या प्रेमाचा अस्सल अनुभव येईल का ?? विचार करा.*
इतिहासात राजे अनेक होऊन गेले. लोकशाहीत लोकप्रतिनिधी म्हणून निवडले गेलेली राजकारणी एकेकजण संस्थानिकच,आहे जणू. पण जनता मात्र यांच्यावर प्रेम करते का ?? त्याला कारणही तसेच आहे. ज्याला प्रेम हवे असेल त्याने,पहिल्यांदा समोरच्याला प्रेम द्यावे लागते. तरच वाट्याला प्रेम व निष्ठा मिळते. शाहूचरित्र ...हेच तर सांगते.
*!! प्रेम द्यावे , प्रेम घ्यावे ....निर्मळ अनुभव अनुभवावे !!*
उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks !
No comments:
Post a Comment