Tuesday, August 15, 2017

समय बडा बलवान 

काळ ही जीवनातली सर्वांत मौलिक गोष्ट असते. जन्मल्याक्षणी प्रत्येकाचा काळ- जगण्याचा कालावधी ठरलेला असतो आणि तो दिवसदिवसानं कमी कमी होत असतो. तो वाढवणं माणसाच्या हातात नसतं. तो उधार उसना घेता येत नाही. तो खात्यावर जमा करून ठेवता येत नाही. जेव्हाच्या तेव्हा त्याचा सदुपयोग करणं हेच माणसाचं उद्दिष्ट असायला हवं. हे ज्यांना कळतं, जमतं ते लोक आयुष्यात काहीतरी कमवू शकतात. गाठीला बांधू शकतात. इतरांचं मात्र श्‍वासावरी आयुष्य सतत जातं. पण हे थांबवण्यासाठी ज्यानं त्यानं वेळ पाळायला पाहिजे, सांभाळायला पाहिजे. 

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...