कोल्हापूर हे परिवर्तन केंद्र ठरले ते शाहूराजाच्या कृतीशील धोरणांनी. लोकहिताकरता जसे धोरण असावे लागते तसे ती धोरणे प्रत्यक्षात राबवणारी माणसेही प्रशासनात असावी लागतात. शाहूराजानी अशी माणसे संस्थानात मुद्दामहून आणलीत तसेच जी कर्तव्यनिष्ठ माणसे आपल्या संस्थानात होतीत त्यांना जिवाभावाच्या मायेने व स्नेहाने कायमचे बांधून ठेवले. शाहूचरित्र वाचताना अशी असंख्य उदाहरणे सापडतील. मला जे उदाहरण येथे सांगायचय ते जरा वेगळे आहे व त्याला एक वेगळा अर्थ आहे.
डाँ. वा़नलेस ...हे दांपत्य मिरजेजवळ दवाखाना चालवत होते. महारोगी , क्षयरोगी यांच्या करता स्वतंत्र वसाहत निर्माण करुन नवीन डाँक्टर निर्माण करण्यासाठी मेडीकल स्कूलसुध्दा स्थापन केले. यामध्ये प्रवेश फक्त हिंदी विद्यार्थ्यांनाच द्यावा कारण कधीतरी हिंदूस्थान स्वतंत्र होईल तेव्हा परकीय लोकांच्या आयातीतून आरोग्याची हाताळणी करणेपेक्ष एतद्देशीयच जास्त उपयोग होईल असे वाँनलेस यांचे स्पष्ट मत होते. केवढा दुरदृष्टीचा माणूस... झालं काय की वाँनलेस यांची पत्नी काँलरा होऊन मृत्यू पडली. आपण एवढे निष्णत डाँक्टर असूनही आपल्या पत्नीला वाचवू शकलो नाही अशी खंत वाँनलेस यांना टोचू लागली. ते स्वतःच आजारी पडले. वाँनलेस हे अमेरिकन मिशानशी संबंधित असल्याने मिशनने त्यांच्या मदतीला नर्स म्हणून लिलियन हेवन्स यांना पाठवले. त्या विधवा होत्या व आपले सारे जीवन रोग्यांच्या शुश्रुषेकरता घालवायचे असा निश्चय त्यांनी केला होता. डाँ. वाँनलेस यांच्या बरोबर काम करताना हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. एकमेकांना आधार वाटू लागले. दोघेही लग्नाला तयार झाले. परंतु अमेरिकन मिशनचा या लग्नाला विरोध होता. ही बातमी शाहूराजाला समजली. एके दिवशी कोल्हापूर संस्थानचा शृंगारलेला रथ मिरज मिशन हाँस्पीटल येथे उभा राहिला. स्वतः शाहूराजा रथ हाकत होते. महाराजांनी निरोप देऊन वाँनलेस व लिलियन यांना रथात बसवले. रथ थेट पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावाबाहेरील चर्चच्या समोर येऊन उभा राहिला. कोडोली मिशनचे प्रमुख डाँ. ग्रँहँम यांनी महाराजांच्या सूचनेने सगळी तयारी केली होती. लग्न झाले. महाराजांनी नवदांपत्याला आहेर करून कोल्हापूरला नवीन राजवाड्यावर एक दिवस आदरातिथ्य केले. दुसरे दिवशी पुन्हा स्वतःच रथ हाकत नवदांपत्याला मिरजेला घेऊन गेले. ...ही गोष्ट काय दर्शविते ?? माणसाच्या गुणांची नुसती पारख करून चालत नाही तर त्या माणसाच्या मनात डोकावून व त्याच्या भावना ओळखून त्याला मदतीचा हात पुढे करायचा असतो तो योग्य वेळी. राजा असल्याचे कसलाच बडेजाव न बाळगणारा शाहूराजा म्हणून तर स्वतः रथाचा सारथी बनला. एखाद्या बुद्धीवंत माणसाची गुणग्राहकता ओळखून त्याला आपल्या राज्यातील प्रजेच्या हिताकरता कसे प्रेमाच्या व स्नेहाच्या धाग्याने बांधून ठेवावे याचे हे उत्तम उदाहरण आहे.
आजकालचे,आमचे राज्यकर्ते हा धडा गिरवतील का ?? प्रत्यक्षात अमेरिकन मिशनला आपल्या अंगावर घेणारा शाहूराजा हा एकमेवच असतो. आजकालचे राज्यकर्ते स्वतःच्या हिताला प्रथम जपतत म्हणून तर सामान्य माणूस चांगल्या चांगल्या लोकसेवेपासून वंचित राहतो. बुध्दीवंताना जवळ करून लोकहीत साधा हाच तर शाहूचरित्र संदेश आहे...
!! प्रेमाने व स्नेहाने ...माणसे लोकहितार्थ " बांधायची " असतात !!
उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks !
No comments:
Post a Comment