Thursday, August 31, 2017

शाहूचरित्र ....काय शिकविते ?? ( भाग २४ )

शाहूराजा हा आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा राजा होता. श्रध्दाळू जरुर होते पण अंधश्रध्दाळू नव्हते . श्रध्दा होती ती डोळस होती. म्हणून तर कर्मकांड नाकारून हा राजा श्रध्देने जगत राहीलाच पण त्याहूनही मोठे म्हणजे कर्मकांडातील फोलपणा जाहीरपणे उघड करु लागला. भोंदू व स्वार्थी हितसंबधी लोक ही केवळ आपले प्रजाजन आहेत म्हणून त्यांची गय केली नाही. स्वतः अंधश्रध्देला बळी न पडता उलट असा आदर्श घालून दिला की पुढील कित्येक पिढ्या कायमची शाहूराजाची याद राखतील. असाच एक कायमचा स्मरणात राहिलसा प्रसंग ...

*जुन्या राजवाड्यातील रेकाँर्डला आग लागली. ही आग विझवायाला इतरांबरोबर स्वतः शाहूराजाही प्रयत्न करीत होते. आग विझून गेल्यावर सकाळी वाड्याच्या आसपास च्या घरावर व भिंतीवर रक्ताची बोटे उठलेली दिसू लागली. ही बातमी महाराजांच्या कानावर गेली. संस्थानातील भटी पिलावळ " महाराज , हे दुश्चिन्ह आहे , मोठी आपत्ती येण्याआधी देवाचे शांतवन केले पाहिजे " असे सांगू लागली. हे शांतवन करण्याची परवानगी महाराजांनी द्यावी असा आग्रह धरु लागली . महाराजांनी योग्य ते मनोमन ताडले.महाराजांनी विचारले " संकट येऊ नये म्हणून तुम्ही देवाचे शांतवन करणार , पण शांतवन केल्यानंतर संकट आल तर मी तुम्हाला सर्वाना जबाबदार धरून तुमच्या पायात बेड्या ठोकीन. आहात कबुल ??" .सगळे भटजी हँ हँ करत दात काढू लागले. महाराजांनी स्पष्ट बजावले " जा , हा फसवण्याचा धंदा बंद करा आता ".....काय दिसून येते यातून ?? शाहूराजा हा आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा राजा होता हे स्पष्ट होते. आजकाल ज्या प्रकारचे युक्तिवाद आम्ही परिवर्तन वादी चळवळीतील कार्यकर्ते करतो तसाच युक्तिवाद शंभर वर्षापूर्वी शाहूराजा करत होता. यालाच तर म्हणतात " वैचारिक वारसा." जो शाहूराजा स्वतः आग विझवायला धावत येतो तो राजा आपली अक्कल भटीजनापुढे गहाण टाकणारच नाही. कारण तो पठडीतला अथवा चाकोरीतला राजा नव्हता , तर आपल्या नवीन विचाराच्या चौकटी आपल्या कृतीशील आचाराने बनवणारा होता.*

शाहूराजाची ही दृष्टी शतांशानेही आमच्या सध्याचे राज्यकर्ते अंगात बाळगू शकले तरीही जनता त्यांच्या कायमच्या ऋणात राहील. पण हे होईल का ?? मला तर नाही वाटत. कारण सोयीपुरते " शाहूराजा की जय " अशी घोषणा देणारे राज्यकर्ते प्रत्यक्षात शाहूविचार राबवत नाहीत. खरे तर आजकालची हीच नवी भटी पिलावळ आहे. अशा सर्वसामान्य रयतेला लुटणारे भटी पिलावळीपासून बुद्धी चातुर्याने दूर रहा...हेच तर शाहूचरित्र सांगते

*!! अक्कल गहाण ठेवू नका...नुसता जयजयकार करु नका...धरा विचाराची कास ..लागू द्या परिवर्तनाची आस !!*

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...